दि.१ जानेवारी २०२४  मौजे शिवना येथील नाभिक समाजाला एक महिन्याच्या आत नियमाप्रमाणे स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्याबाबत तालुका दडाधिकारी तथा तहसिलदार सिल्लोड यांनी २९ जुलै रोजी मयत वृद्धेचा मृत देह तहसिल कार्यालयात आणल्या नंतर दिलेल्या लेखी आश्वासनाचे  पत्र दिले होते . परंतु ५ महिने उलटून गेले परंतु कार्यवाहीची पूर्तता न केल्याने  १ जानेवारी रोजी नाभिक संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तहसिलदार यांना केसांचा हार व दालनात केसांच्या पायघडया टाकून आंदोलन करण्यात आले .
     राष्ट्रीय नाभिक संघटना व सकल नाभिक समाजाच्या वतीने तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सिल्लोड याच्या सह जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद, ग्रामिण पोलिस अधीक्षक, व शहर पोलीस ठाणे यांना लेखी निवेदन देऊन कळविले आहे की,  मौजे शिवना येथे कै. सुगंधाबाई दत्तु पंडीत यांच्या अंत्यविधीसाठी शिवना येथे समाज बांधव गेले तेथे अतिक्रमण होते. त्यामुळे  स्मशानाभुमीतील अंत्यविधीसाठी अतिक्रमण तात्काळ काढून देण्यात यावे या मागणीसाठी सदरील प्रेत तहसिल कार्यालय सिल्लोड येथे घेऊन आल्यामुळे त्या अनुषंगाने तहसिलदार सिल्लोड यांनी पत्रा द्वारे कळविले होते कि, आपले नियमित अंत्यविधी करणेच्या ठिकाणी आपण अंत्यविधी क्रिया धार्मिक विधी/परंपरा प्रमाणे पुर्ण करुण घ्यावा, व मा. जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी यापुर्वी दिलेल्या पत्रानुसार आगामी १ महिष्याच्या आत आपल्या नाभिक समाजासाठी नियमाप्रमाणे स्मशानभुमीची जागा उपलब्ध करुन देऊन त्या अनुषंगाने शासन दप्तरी त्याची नोंद मा. उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांचे आदेशानुसार घेण्याबाबतची प्रक्रिया करण्यात येईल, असे लेखी आश्वासन त्यावेळी दिले होते. परंतु सदर प्रकरणी ०५ महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही आज पर्यंत सदरील स्मशानभूमी नावावर करून देण्याबाबत काय कारवाही झाली हे समाजाला अवगत केले नाही व सदरील पत्रानुसार लेखी पत्राची पूर्तता झालेली नाही. वारंवार निवेदन देऊनही कोणतीही ठोस उत्तर मिळत नाही.  यामुळे आपण समाजाची दिशाभूल केलेली आहे हे उघड होत आहे. करिता सदरील शिवना येथील नाभिक समाज स्मशानभूमीचे दस्त पूर्ण करून समाजाच्या नावे तात्काळ करण्यात यावे असे निवेदन २४ डिसेंबर रोजी दिले होते परंतु  सदरील प्रकरणी  कारवाही न झाल्याने अखेर नववर्ष दिनी विसर पडलेल्या सिल्लोड तहसिलदारानी  नवीन वर्षात तरी समाजाला न्याय देत स्मशानभूमी नावे करत समाजाच्या नावे करावे यासाठी दि. १ जानेवारी रोजी सकाळी १२ वाजता लोकशाही मार्गाने तहसिलदार सिल्लोड यांच्या दालनात समाजच्या वतीने केसांच्या पायघड्या व दालनाला केसांचा हार घालून आंदोलन सुरु करण्यात आले होते ते ३ तास चालले . यावेळी पत्रकार दादासाहेब काळे ( महाराष्ट्र संघटक राष्ट्रीय नाभिक संघटना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप गवळी , जिल्हा संघटक सुनिल वैद्य , जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा सांडू वाघ , भगवान दत्तू पंडित, सुपडू बाबुराव पंडित,  सुनील बाबुराव वर्पे, संदीप रंगनाथ पंडित, कैलास पंडित , संतोष भिकाजी वाघ ( तालुकाध्यक्ष ), विजय संजू पंडित,  राजु सुरडकर,  रत्नाकर बिडवे, राजेंद्र पांडव,  दत्तू बिडवे,  अशोक वर्पे, अतुल वाघ, अशोक वाघ, सदाशिव पांडव,  विजय पंडित,  रामा तोसेवाल, अक्षय वाघ, दीपक वाघ, आवडाजी बिडवे, मनोज बिडवे यांच्यासह अनेक नाभिक बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सवाद्य ३ तास आंदोलन करत दालनाला केसांचा हार घालुन दालनापुढे केसांच्या पायघडया टाकण्यात आल्या . राज्यातील अशा प्रकारचे हे स्मशान भुमी साठी पहिले आंदोलन ठरले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here