नागपूर : आम आदमी पार्टी, नागपूर तर्फे 193 व्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्त्री मुक्ती दिन कॉटन मार्केट चौक नागपूर मध्ये सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सावित्राबाईच्या जयंती निमित्य पुस्तकं, प्रसाद वाटून साजरी करण्यात आले. त्यांचा विचार जनसामान्य लोकांपर्यंत पक्षा मार्फत नागपूर शहरांमध्ये शिक्षणाचे ज्योत आम आदमी पार्टी तर्फे सामान्य गरीब लोकांपर्यंत दिल्लीप्रमाणे नागपूर महानगरपालिकेत पण दर्जेदार आणि मोफत शिक्षणाची ज्योत पोहोचवण्यासाठी पक्षाला सत्तेत आणण्याचे  शपथ पदाधिकारी व नागरिकांनी घेतली. हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्री भूषण ढाकुळकर, शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे यांचे नेतृत्वाखाली संपन्न झाला.  ह्या कार्यक्रमात प्रामुख्याने वरिष्ठ नेते डॉ. शाहिद अली जाफरी, महासचिव नागपूर डॉ. अमेन नारनवरे, संघटनमंत्री रोशन डोंगरे, उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण शैलेश गजभिये, उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण संजय बोरकर, उपाध्यक्ष नागपूर शहर विपिन कुर्वे , महिला उपाध्यक्ष अलकाताई पोपटकर, करण शाहू उपस्थित होते.
    शैक्षणिक ध्येय धोरणे विचार दिल्ली आणि पंजाब मधील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेनुसार जनहिताची केलेल्या कामांची माहिती शहरांच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील व जिल्ह्यात लोकांच्या समस्या सोडवण्याचे काटेकोट प्रयत्न करतील. शैक्षणिक भ्रष्टाचार विरोधात पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करतील हा विचार ठेवून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली.
    प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सय्यद हसन अली, सचिन वाघाडे, शिरीश तिडके, बालू भाई पटेल,  संदिप कोवे, स्वप्निल सोमकुवर, शुभम पराले,  चंद्रशेखर पराल, संदीप कोवे,  चैताली रामटेके, अर्चना राळे, नीलिमा नारनवरे, पिंकी बारापात्रे, अमन मेश्राम, प्रजय रामटेके,  अनिल राहुलकर, प्रणित डोंगरे व शेकडो नगरीकाच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here