दिव्य वतन, वरोरा प्रतिनिधी धर्मेंद्र शेरकुरे
आदिवासी हा देशाचा मूळ निवासी आहे,वनवासी नाही.आदिवासींना भारतीय घटनेने अनुसूचित जमाती म्हणून आरक्षणाचे अधिकार दिलेत. मात्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून खर्या आदिवासी वर अन्यायच होत गेला. खऱ्या आदिवासींना खऱ्या अर्थाने आरक्षणाचे हक्क मिळालेच नाही. प्रारंभीच्या काळात क्षेत्र बंधनामुळे व नंतरच्या काळात बोगस आदिवासी मुळे खऱ्या आदिवासीचे अतोनात नुकसान झाले. शिक्षणातील आणि नोकरीतील लक्षावधी जागा खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे बोगस आदिवासींनी बळकावून घेतल्या. खऱ्या आदिवासी समाजाला न्याय मिळावा म्हणून वेळोवेळी आंदोलने केली. कोर्टकचेऱ्या झाल्यात परिणामी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी कमीट्याची  स्थापना करण्यात आली. त्यामुळे आता खऱ्या आदिवासींना न्याय मिळणार असे वारे वाहू लागले परंतु दिनांक 15 /6 /19 95 चा जीआर आणि दिनांक 21/ 10/ 2015 च्या शा.प. मुळे खऱ्या आदिवासींच्या आशा अपेक्षा पार धुळीस मिळाल्या. राज्यातील सरकार बदलले परंतु सरकारचे आदिवासी विरोधी धोरण बदलले नाही. एन.टी. मध्ये असलेल्या धनगर आणि हलबा कोष्टी इतर गैर आदिवासी जातींना आदिवासीचे आरक्षण मिळावे म्हणून सरकारचे प्रयत्न सुरूच शिवाय अनुसूचित जमातीच्या यादीतील 17 जमातीचे सर्वेक्षणही सुरू करणार आहे. म्हणजे काही जमातींना आदिवासींच्या यादी मधून वगळणे आणि नव्या जमातींना आदिवासींमध्ये घुसविणे असा सरकारचा कुटील डाव आहे. बोगस आदिवासी ना पाठीशी घालने म्हणजे खऱ्या आदिवासींच्या पाठीत खंजीर खुपसणे होय. आदिवासीच्या जमिनी हस्तांतरण आणि विस्थापनाचा प्रश्न, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न, आश्रम शाळा व वस्तीगृहातील दुरावस्था आणि सोयी सुविधांचा अभाव तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांची बेरोजगारी अशा प्रश्नांची दखलही सरकारने अद्याप घेतलेली नसल्यामुळे गोंडियन आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती वरोरा तर्फे दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता हा महामोर्चा जैयतुर पेनठाणा रेल्वे उडान पुलावरून निघेल. जैयतुर पेंणठाना उडान पुलावरून- साई मंगल कार्यालय- खापणे दवाखाना -कामगार चौक- आंबेडकर चौक- राणी दुर्गावती चौक मार्गक्रमण करत उपविभागीय कार्यालय वरोरा येथे मोर्चाचे समापन होणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व विलास प्रचाके रमेश मेश्राम भास्कर तुमराम हे करणार असल्याची माहिती गोंडियन आदिवासी आरक्षण पबचाव कृती समितीचे विलास परचाके, रमेश मेश्राम ,वैशाली तोडासे ,भास्कर तुमराम ,प्रभाकर कुडमेथे,गजानन मेश्राम ,संदीप नैताम, पुष्पा मंगाम ,पूजा परचाके,सुधीर कोवे, तुलशीअलाम, चिंतामण आत्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here