दिव्य वतन, नागपूर : शानिवार दि.02 डिसेंबर 2023 रोज कंत्राटी कामगारांचे लोकप्रिय कामगार नेते भाई बाबू भालाधरे यांचा 7 वा स्मृतीदिनानिमित्त याच दिवशी 2016 मध्ये भाई तमाम पीडित कामगारांना सोडून आपल्यातुन निघून गेले. या दिनी कामगारांनी रोजंदारी मजदूर सेना कार्यालयात भाईजीना श्रद्धांजली वाहून सदर दिवस संघर्ष दिन म्हणून साजरा केला जातो. संघटनेचे संस्थापक सदस्य भाई मनोज घरडे, भाई शिवशंकर बडवाइक संस्थापक सदस्य, भाई महेंद्र बागडे विदर्भ अध्यक्ष, भाई प्रकाश फुलवरे विदर्भ सचिव यांनी महामानवाचे अर्धकृती पुतळ्याचे पुष्पमाला अर्पण करून मेणबत्ती लावून भाई बाबू भालाधरे यांचे प्रतिमेचे पूजन केले आणि सर्व कामगारांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्रातील कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, भुसावळ, परळी, पारस, तिरोडा येथील कंत्राटी कामगारांनी भाई बाबू भालाधरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दिनांक 13 डिसेंबर 2023 ला हिवाळी अधिवेशन नागपूर येथे महाराष्ट्र राज्य रोजंदारी मजदूर सेनेद्वारा विधानसभेवर मोर्चा काढून कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता बहुमताने निर्णय घेतला आणि आपले दिवंगत नेते बाबुभाई भालाधरे यांचे असलेले अपूर्ण कार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि श्रद्धांजली सभा संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here