नागपूर : राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ संलग्नित डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघा च्यावतीने शनिवार, ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर जयंती अर्थात पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शन व सन्मान सोहळ्याचे आयोजन  डब्ल्यू एच न्यूज़ तर्फे करण्यात आलेले आहे. सिव्हील लाईन प्रेस क्लब येथे सकाळी ११ ते २ या वेळेत हा सोहळा होणार आहेत. त्यावेळी अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र असतील. तर जिल्हाधिकारी मा. विपीन इटनकर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, ‘मटा’चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, ज्येष्ठ पत्रकार तथा देशोन्नतीचे संस्थापक व संपादक प्रकाश पोहरे, प्रेस क्लबचे सचिव व नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, प्रभाकर दुपारे, व्यवस्थापक टिळक पत्रकार भवन, अमन कांबळे, आवाज इंडिया टीवी संचालक, विजय खवसे, डब्ल्यू एच न्यूज़ संपादक आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी ‘डिजिटल मीडिया आणि करिअरच्या संधी’ विषयावर डिजिटल मीडियाचे अभ्यासक देवनाथ गंडाटे माहिती देतील. अशी माहिती भिमराव लोणारे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here