नागपूर जिल्हा महानुभाव पुजारी भोपे महासभेच्या च्यावतीने मधुबन व्हिलेज काटोल हातोला येथे होणाऱ्या महासभेच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनात महासभा अधिवेशन, मान्यवरांचा सत्कार, पुरस्कार वितरण, गुणगौरव, दिनदर्शिका प्रकाशन, मान्यवरांचे मनोगत आणि समाज स्तरावरील ठराव तसेच वधु -वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील व राज्याच्या बाहेरून आलेल्या नवोदित वधू-वरांचा व पालकांचा परिचय मेळावा या दरम्यान इच्छुक उमेदवारांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्येकी जोडप्याला 25 हजाराची एफडी करून देण्यात येईल. असे पत्रपरिषदेत सांगण्यात आले. व समाज हितासाठी हा कार्यक्रम तळागाळातील समाज बांधवांपर्यंत पोहोचवा हेच ध्येय आहे. समाजाला मजबूत सुदृष्ट व विकास कार्य करण्याचा पण महासभेने घेतला आहे. कार्यक्रमाप्रसंगी महानुभाव पुजारी भोपे समाजातील थोर राष्ट्रीय मंडळी आणि राजकीय क्षेत्रातील प्रमुख अतिथी यावेळी उपस्थिती राहतील. प्रामुख्याने नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, अनिल देशमुख, चरण सिंग ठाकूर, अविनाश ठाकरे, दिनेश ठाकरे आणि महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबरावजी महानुभाव तसेच महासचिव बाळकृष्णजी मेहकरकर यांची उपस्थिती राहतील. मुळ उद्देश पुजारी भोपे समाजाचे देवस्थान यांच्या विकासाच्या दृष्टीने शासनदरबारी पाठपुरावा करून ते मान्य करून घेणे यासंदर्भात मोठी सुरू चळवळ सुरू झाली आहे. तसेच रिद्धपूर येथील विद्यापीठाला सर्वत्र श्री चक्रधर स्वामीचे नाव देण्यात यावे अशी मागणी यावेळी केली. नागपूर जिल्हा महानुभाव पुजारी भोपे महासभा अंतर्गत पत्रपरिषद संबोधित करतेवेळी राजू पुसदेकर, प्रदीप कोठीकर, विलास घुगे, प्रकाश मानेकर, अनिता कळमकर आणि उपस्थित भगिनी छाया पुसदेकर, स्वाती पुसदेकर, नेहा तळेगावकर यावेळी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here