सालेकसा
  नागपूर विभागीय कार्यालयांतर्गत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना तथा साले कसा तालुक्यातील दरबडा ग्रामपंचायत मध्ये लोकप्रतिनिधीने सुचलेल्या कामांमध्ये फार मोठी तफावत दिसत असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात तत्कालीन सरपंच सचिव यांनी रेकॉर्डमध्ये खोडतोड तसेच पंधरावा वित्त आयोग 14 वा वित्त आयोग मध्ये फार मोठी तफावत दिसत आहे त्यामुळे तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांनी संगणमत करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे यात 2515. 30 54 दलित वस्ती जन सुविधा योजनेचा यांच्यासह विविध कामातही सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तसेच ग्रामरोजगार सेवकांची पत्नी कामावर न जाता त्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यात आले त्याच्यामुळे त्याचप्रमाणे दरबडा येथील माजी सरपंच पटले यांचे मुलगा हे सुद्धा कामावर दाखवून त्यांच्याही बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे ग्रामसेवक हे ग्रामसभेत व मासिक सभेत कसलेही प्रकारचे रेकॉर्ड दाखवत नव्हते आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करत असल्याचे आरोप सरपंच तामिल कुमार टेभरे यांनी केला आहे यापूर्वी अनेकदा तक्रार निवेदन देण्यात आले परंतु त्यांच्या तक्रारीला कचऱ्याच्या पेटीत टाकून भ्रष्टाचार दाबण्याच्याही प्रकार वरिष्ठ अधिकारी व काही जन लोकप्रतिनिधी करीत आहेत सदर या तक्रारीची दखल घेण्यात यावी व संबंधित जिल्हाधिकारी मुख्य कार्यपालन अधिकारी उपायुक्त गटविकास अधिकारी तहसीलदार यांनी विशेष लक्ष देण्यात यावी व दरबडा येथील सर्व शासकीय कामाच्या कागदपत्राची चौकशी करण्यात आली असी मागणी सरपंच तामिळ कुमार टेभरे यानी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here