अहमदपूर : आज किलबिल शाळेत बालिका दिन म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील मुलींसाठी GIRL’S HEALTH HYGIENE या विषयावर मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास प्रमुख मार्गदर्शिका म्हणून शहरातील सुप्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. नेहा पाटील मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मुलींना मार्गदर्शन केले. त्यांच्यासमवेत जनरल फिजिशियन डॉ. प्रतिमा येलगट्टे मॅडम ही उपस्थित होत्या. कार्यक्रमास संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले प्राचार्य संतोष पाटील पर्यवेक्षक महावीर गोडभरले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली जगताप यांनी केले तर सदरील कार्यक्रमास शाळेतील सर्व मुली व शिक्षिका उपस्थित होत्या. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here