13 व्या शतकातील जैन तिर्थकारांची मुर्ती असल्याची माहिती
वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील केळझर येथे यादवकालीन पशानमूर्ती आढळून आलीय, केळझर येथील तुळजापूर –  नागपूर मार्गावर असलेल्या बुध विहार परिसरात ही मूर्ती आढळून आली आहे. परिसरातील शेतामध्ये शेळ्या चारणाऱ्या गुराख्याच्या निदर्शनास ही मुर्ती आलीय. अधिक खोदकाम केल्यावर ही मुर्ती बाहेर काढण्यात आली आहेय. 44 सेंटिमीटर जाडी आणि पाच फूट उंच असलेली ही मूर्ती यादवकालीन 13 व्या शतकातील असल्याचे पुरातत्व विभागाची माहिती आहेय. अखंड पाषाणात या मुर्तीचे कोरीवकाम करण्यात आले आहेय. ऐतिहासिक मुर्ती असून जैन धर्मातील तिर्थकार वृषभपंत महाराजांची ही मूर्ती असल्याची माहिती आहेय. सेलू तहसीलदार डॉ. स्वप्नील सोनवणे, आणि सेलू पोलीस प्रशासनांकडून खबरदारी घेण्यात आलीय. पुरातत्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक, श्याम बोरकर, शरद गोस्वामी , दीपक सुरा, सोनुकुमार बरनवाल यांनी केळझर येथे भेट देत मूर्तीची पाहणी केलीय. पुढील सर्वेक्षणासाठी मुर्ती नागपूर येथील पुरातत्व विभागाच्या स्वाधीन करण्यात आलीय. ही मूर्ती नागपूर येथील सेमिनरी हिल येथील पुरातत्व भवन येथे ठेवण्यात येणार आहेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here