नांदेड जिल्ह्यातील ता. कंधार शहरात अक्षदा कलश शोभायात्रा ५ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर येथून निघून श्री राम मंदिर येथे समारोप झालेल्या शोभायात्रेत श्रीरामाच्या जयघोषात संपूर्ण शहर दुमदुमले गेले. महिलांच्या उपस्थितीने व  प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने कंधार वासीयांचे लक्ष वेधून घेतले.
   अयोध्या येथे  प्रभू श्रीराम मंदिर निर्माण कार्य पूर्ण झाले, असून २२ जानेवारी रोजी साधू संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये अयोध्या येथे प्रभू श्रीरामललांची  प्राणप्रतिष्ठापना होणार आहे, या अनुषंगाने देशभर मोठ्या प्रमाणामध्ये जय्यत तयारी चालू आहे. त्याच अनुषंगाने कंधार तालुक्यामध्ये अयोध्या येथून आलेले श्री राम अक्षता यांची दिनांक पाच जानेवारी रोजी शोभायात्रा काढण्यात अली ,सकाळी दहा वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर वाहतुक नगर येथून या शोभायात्रेची  सुरुवात झाली. यावेळी गणाचार्य मठ संस्थान मुखेडचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते श्री अक्षता कलश पूजन व श्रीरामाच्या उत्सव मूर्तीचे पूजन करण्यात आले. नंतर ही शोभायात्रा कंधार शहरातील भवानीनगर, महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक  या मार्गे  प्रभू श्रीराम मंदिर या ठिकाणी मार्गस्थ झालीं. जागोजागी कंधार शहरातील प्रभू श्रीराम भक्तांनी या अक्षदा कलश यात्रेचे स्वागत आतिश बाजी , पुष्वृष्टी व औक्षण करून स्वागत केले यात मोठ्या प्रमाणावर महिलांनचा सहभाग होता. डोक्यावर कलश घेऊन प्रभू श्रीराम नामाचा जयघोष करत शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिला, व वैष्णव पंथीय वारकरी सांप्रदायिक मंडळीही आपल्या टाळ मृदंगाच्या नाद गर्जनेत  प्रभू श्रीराम नामाच्या जयघोषाने तल्लीन झाले. या शोभा यात्रेमध्ये कंधार शहरातील सर्व लहान थोर व महिलांचाही अधिक प्रमाणात समावेश होता. या शोभायात्रेचा समारोप श्री क्षेत्र उमरज संस्थांचे मठाधिपती श्री संत एकनाथ नामदेव महाराज यांच्या हस्ते अक्षता पूजन व प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली. यावेळी एकनाथ नामदेव महाराज  म्हणाले, प्रभू श्रीरामांचे मंदिर होणे हे भारतीयांच्या दृष्टीने गौरवशाली बाब ठरली आहे ,आपल्या संस्कृतीचा मानसन्मान, स्वाभिमान, आणि आपल्या परंपरेची पराकाष्ठा उंचावणारा आहे. या शोभायात्रेत  प्रभू श्रीराम मंदिर कंधार चे महंत अरविंद महाराज रामदासी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी, सदस्या प्रणिता ताई देवरे चिखलीकर, माजी जिल्हापरिषद सदस्य प्रा पुरुषोत्तम धोंडगे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड, तालुका अध्यक्ष किशन डफडे, मधुकर डांगे, हनुमंत डुमणे, राजकुमार कोकाटे, बाबुराव गंजेवार, भगवान महाराज व्यास, चेतन केंद्रे, गुलाबराव नळगे, उत्तम चव्हाण, भगवानराव कागणे,  मोहन मुत्तेमवार, डॉ. रामभाऊ तायडे, योग शिक्षक निळकंठ मोरे सर, यांच्यासह प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय उपविश्वविद्यालयाच्या ज्योती बहेणजी, रोहिणी गंजेवार, मनिषा गंजेवार,  डॉ. जय मंगल
औरादकर, सुनंदा वंजे, कल्पना गीते, सरला महाजन, अनिता मामडे, वर्षा मुत्तेपवार, शोभा गंजेवार, राजश्री गंजेवार, राजश्री पदमवार, ज्योती मामडे, प्रणिता पापिनवार, रेवती मुखेडकर, विद्या पापिनवार, अनुराधा जवादवार, जयश्री भोसकर, प्रतिभा फरकंडे, सपना मुखेडकर, सारिका बिडवई, देउबाई गोरे, शोभा संगणवार, विमल बंदुके, अनुराधा मुत्तेपवार, प्रणिता पापिनवार, शीतल नळदकर, प्राची मामीडवार, अस्मिता नळदकर, प्रिया लाटकर, श्यामा दंडवते, विमल वडजकर, मंगल पांगरेकर, अमिता दहीहंडी, रेणुका उलेवाड, दीपिका व्यास, रेखा व्यास, संगीता बनसोडे, अश्विनी बच्चेवार, गोदावरी धरेवाड, वर्षा कुलकर्णी, आशा बनसोडे, कमल भिसे यांच्यासह लोकोत्सव समितीचे सर्व सदस्या महिला भगिनी व मान्यवर उपस्थित होते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here