नागपुरातील, संविधान चौकात, १ जनवरी रोजी “भीमा कोरेगांव युध्दाचा, 206 वा शौर्य दिवस” (१-१-१८१८ ची लढाई)” साजरा करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक पाहुणे “विरों के विर इंडियन पार्टी” (VVIP) चे, राष्ट्रीय अध्यक्ष, लालजी भाई बोदर (गुजरात), ह्यांनी, २०२४ आणि त्यानंतर होणारे लोकसभा निवडणुकीत अशा लोकांना तिकीट द्यायला पाहिजे, ज्यांनी कमित कमी ५ वर्षे भारताच्या बॉर्डर वर देशाची सेवा केली आहे, सर्व उमेदवार शिक्षित, दिक्षित, झिरो परसेंट क्रिमिनल असावे, भ्रष्टाचारचा कोणताही आरोप झालेला नसावा, १०१ टक्के देशभक्त असले पाहिजेत.
VVIP  पार्टीने सर्व ५४३ सीटावर असे उम्मीदवारांना,  तिकीट दिले आहेत ज्यांनी,  जलसेना, थलसेना, वायुसेना, सीआरपीएफ, बीएसएफ येथुन नोकरी करून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आम जनतेला आवाहन केले आहे कि, २०२४ च्या निवडणुकीत, लोकांनी, धर्म, वंश, वर्ण, जातीच्या नावावर व्होट न करता, सर्व ५४३ सीटांवर, शिक्षित, दिक्षित आणि भारत राष्ट्राला १०१ टक्के समर्पित देशभक्त, बेदाग लोकांना व्होट देऊन विजयी करा. हे तुम्ही निवडुन दिलेले प्रामाणिक प्रतिनिधि सर्व मिळुन, आपल्या सर्वांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न करतिल. एक मनुष्य हे एवढे मोठे काम करू शकत नाही.  सर्व मिळून सर्वांच्या समस्यांचे समाधान करु शकतात. आपण मायबाप जनतेच्या हातात अमुल्य व्होटांचा अधिकार  आहे. त्याचा सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून वापर करावा आणि विरोंके विर सरकार स्थापन करण्यास मदत करावी. सभेचे प्रास्ताविक गोवर्धन कुंभारे (माजी वायुसैनिक) ह्यांनी केले. सभेला राजेंद्रपाल गौतम (माजी मंत्री, दिल्ली) यशवंत निकोसे (माजी मंत्री, मध्य प्रदेश) गोपाल भारती (राष्ट्रीय संयोजक, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा) जगजीत सिंह अरोड़ा (अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन), जावेद पाशा (अखिल भारतीय मुस्लिम मोर्चा) एडव्होकेट पिसे (OBC Sangharsh Samiti) आदींनी प्रबोधन केले. ई झेड खोब्रागडे (सेवानिवृत्त IAS अधिकारी) ह्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. राजरतन कुंभारे (सेवानिवृत्त कृषी अधिकारी) आणि समता सैनिक दलाच्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भीमा कोरेगाव शौर्य स्तंभ प्रतिक मानवंदना दिली. हि सभा गोपाल भारती ह्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. आणि संचालन अनिलकुमार नागबौद्ध ह्यांनी केले. सभेला विदर्भातील VVIP पार्टी चे २०२४ लोकसभा उमेदवार आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे गोवर्धन कुंभारे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here