काल रोजी ९ जानेवारी २०२४ ला युवा जागर संघटने मार्फत डॉ. चाचरकर यांना संदीप देशपांडे यांचा मार्गदर्शनात व इम्रान शेख यांचा नेतृत्वात निवेदन सादर करन्यात आले, नागपूर शहरातील सर्वच महिला भगिनी प्रसुती करीता “डागा हॉस्पिटल” ची निवड करतात कारण की माफक दरात शासनाचा सर्व सोईनी सुसज्य असा हा दवाखाना संपुर्ण शहरात प्रसिद्ध आहे. तरीदेखील गोर गरीब जनतेसाठी सोई पूरविणे कठीण जात आहेत. यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण चतुर्थ श्रेणीतील कर्माचाऱ्यची कमतरता तसेच काही प्रमाणात अप्पर श्रेणीतील जागा रिक्त आहे अशाने अनेक महिलांना व परिजनाना याचा त्रास होत आहे. याची दखल तत्काल घेण्यात यावी अशी सक्तीची विनंती सर्व युवकांच्या समवेत करण्यात आली या सर्व रिक्त जागेची संबंधित माहिती शासनाला दयावी जेणेकरून गोर गरीबाची भविष्यात हेळसान होणार नाही याप्रसंगी प्रणय कुंभलकर, योगेश गिरी, सौरभ चट्टे, रोशन देवगडे, मोनिका कुंभारे, रेणुका गिरी, रतन हुमणे, वैभव मेश्राम, विनोद धामणकर, राहुल डुबलवार इत्यादी युवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here