शिवशक्ती नगरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा
नागपूर : दक्षिण नागपूरच्या शिवशक्ती नगर नं. 2 व 3 येथील श्री हनुमान सेवा पंच कमेटीच्या वतीने हनुमान मंदीरात, सोमवार दि. 22 जानेवारी 2024 रोजी, अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्च्या अनुषंगाने त्यांच दिवशी व त्याच वेळेस भगवान प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असून श्री विठ्ठल रुख्मीनीची सुद्धा स्थापना करण्यात येत आहे.
22 जानेवारीला अयोध्येत भगवान श्रीरामाच्या मूर्तीचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यासाठी सर्वच ठिकाणी जोरदार तयारी सुरू झाली असून नगरातील सर्व नागरीकांचा भव्य प्रतिसाद व उस्फुर्त सहकार्य मिळत आहे. याकरीता संगमरवरी व तेजस्वी मुर्त्या आणण्यात आल्या आहेत.
        दि. 21 जाने 2024 ला, सकाळी 5:45 वाजता. काकडा आरती नंतर दुपारी १ वाजता: सामुहीक हनुमान चालीसा व “श्रीराम जय राम जय जय राम” चे 108 वेळा पठण व भव्य शोभायात्रा सायंकाळी 6 वाजता सुंदरकांड (श्री शिव स्वराज्य मंडळ) व दिव्योत्सव दुसऱ्या दिवशी सोमवारी दि. 22 जाने 2024 ला सकाळी 5:45 वाजता काकडा आरती
दुपारी 12 वाजता: प्राणप्रतिष्ठा (अयोध्येतील वेळेच्या मुहूर्तावर) दुपारी 3 वाजता. गोपाळ काल्याचे किर्तन, ह.भ.प. किसनाजी महाराज सायंकाळी 7 वाजता: महाप्रसाद (भाकरे महाराज याचे शिष्य) याप्रमाणे कार्यक्रम होणार असून या आनंद सोहळ्यात सर्व रामभक्तानी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here