नागपूर : ममता हेल्थ इंस्टिट्यूट फॉर मदर एंड चाइल्ड प्रोजेक्ट जागृती अंतर्गत किशोर कौशल कक्षा कार्यशाळा (K4) नागपुर मधील 14 शाळेमधील 1300 विद्यार्थी आणि 40 शिक्षकाना जीवन कौशल विषयी माहिती दिली. ज्यामध्ये संचार कौशल, समूह कार्य कौशल, समस्या निवारण कौशल, निर्णय कौशल ज्यामुळे किशोरवयींन मुला-मुलींना त्यांचा जीवनात येणाऱ्या गंभीर समस्यान्ना तोंड देण्यास मदत होणार व योग्य निर्णय घेण्यास मदत मिळेल. तसेच समूहात कार्य करतांना कोणत्या गोष्टीची सावधानी घ्यावी या कार्यक्रमा द्वारे गतिविधि करुण सांगण्यात आले करिता दिल्ली येथून आलेले डॉ. गौरव कपूर व राज्य समन्वयक पल्लवी भांडारकार यांनी जीवन कौशल विषयी विविध गतिविधि चा माध्यमातून माहिती दिली. या कार्यक्रमाचा उद्देशाने समुदाय, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण कौशल्या अंतर्गत जीवन कौशल्याची अंतरात्माीकता भरली. संपूर्ण प्रशिक्षण सत्रात प्रतिस्पर्धी समस्या सोडविन्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आणि संवाद कौशल्यासाठी मौलिक साधने तसेच टीम वर्क याविषयी माहिती दिली. ममता हेल्थ इंस्टिट्यूट फॉर मदर एंड चाइल्ड प्रोजेक्ट जागृती अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे आणि राज्य समन्वयक पल्लवी भांडारकर व डॉ. गौरव कपूर यांचा विशेषज्ञतेच व मार्गदर्शनामुळे विद्यार्थी व शिक्षक प्रेरित झाले. त्यांचा विशिष्ट मार्गदर्शनामुळे त्यांनी ते वास्तविक जीवनात लागु करण्यास सक्षम झाले ज्यामुळे व्यक्तिगत विकास होत आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट जागृति मधील ब्लॉक सुपरवाइजर व संपूर्ण ORW यांनी सहयोग दिला. हा कार्यक्रम 2 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधित नेहरू नगर झोन, गांधीबाग झोन, कामठी झोन, लक्ष्मीनगर झोन येथील शाळेमधे राबविण्यात आला अशी माहीती पल्लवी भांडारकर राज्य समन्वयक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here