नागपूर : ७ जानेवारी रोजी, अंभोरा येथे योग सहल गेली असता, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगगुरु सचिनजी माथुरकर यांच्या मार्गदर्शनात सर्व योगाप्रेमी शिबिरार्थी यात सहभागी झाले होते. सकाळी ७ वाजता निघून ९ वाजता अंभोरा येथे वेलतूर या ठिकाणी गेली असता, शहारे यांच्या सभागृहात संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. १० वाजता दीपप्रज्वलनाने आणि गायत्री मंत्राने सुरुवात झाली. नंतर प्रार्थना आणि गुरुवंदना झाली. मंचावर उपस्थित योगगुरु सचिनजी माथुरकर उपाध्यक्ष पद्माकर गजापुरे, सचिव शीला केळापुरे, प्रोजेक्ट डायरेक्टर अजयजी सातफळे, विद्याताई रणदिवे स्थानबद्ध होते. सर्व मान्यवरांचा परिचय आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  प्रणाली खरबडे यांनी सुमधुर गीत गायले.  विद्याताई यांनी सहलीबद्दल माहिती व सहलीचे नियम सांगितले. आणि संस्थेचा परिचय करून देण्यात आला. 2024 साठी योगदर्शिका हे कॅलेंडर काढण्यात आले. त्याचेही प्रकाशन करण्यात आले. अजय सातफळे यांनी याविषयी पूर्ण माहिती दिली नंतर सचिनजीनीं सर्वांना मार्गदर्शन केले. सर्वजण भ्रमंतीसाठी निघालेल्या पाच नद्यांचा संगम असणारी जलदेवता खूपच अथांग भरलेली होती. तिला नमन करून टेकडीवर असलेल्या साक्षात महादेवाचे दर्शन घेतले व परत आपल्या नियोजित स्थळी आले. थोडं मनोरंजनाकडे वळलो अंताक्षरी, शब्दावरून गाणं ओळखणे, रस्सी खेच अशी खेळ खेळून सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन खूप आनंद घेतला. या सुंदर कार्यक्रमाचे संचालन सुनीलजी पोद्दार यांनी केले. प्रोजेक्ट डायरेक्टर अजय सातफळे  विद्याताई रणदिवे यांनी कार्यक्रमाचा भाग सांभाळला. अतिशय शिस्तबद्ध, मनोरंजन, ज्ञान, आनंद, देणारी ही योग सहल झाली. यात पाचशे योगाप्रेमी, शिबिरार्थी सहभागी होते. सुख शांती समाधान ही संस्था योगाचे कार्य गेल्या १८ वर्षापासून निःशुल्क, निस्वार्थ व सेवाव्रती होऊन करीत आहे. शरीर, बुद्धी, मन, या त्रिवेणी संगमात सर्वांनी निरोगी राहावे. या मनोकामनींनी हे कार्य अव्याहात सुरू आहे. असे शीला केळापुरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here