हलबा समाजाने राजकीय पटलावर नेतृत्व करण्याचे आव्हान – संजय हेडाऊ
          माजी खासदार स्वर्गीय राम हेडाऊ यांची 93 वी जयंती लोकनेता रा. बा. कुंभारे विचार मंच च्या माध्यमातून गांधी बाग व राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने गोळीबार चौक येथे साजरी करण्यात आली याप्रसंगी राम हेडाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण  करून आदरांजली वाहण्यात आली.
          यावेळी संजय राम हेडाऊ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अभिवादन सभेमध्ये राम हेडाऊ यांच्या जीवनपटावरती प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे राजकीय पटलावर समाजाची  शक्ती वाढवली तरच समाजाचे प्रश्न सुटतील असे संबोधित केले. येणाऱ्या निवडणुकीत हलबा समाज आपली ताकद दाखवणार असल्याचे सांगून हलबा समाजाने राजकीय नेतृत्व करण्याचे आवाहन असल्याचे संजय हेडाऊ यांनी प्रतिपादित केले. याप्रसंगी प्रा. प्रकाश निमजे,  शरद सोनकुसरे, माजी नगरसेवक सर्वश्री अश्विन अंजीकर, प्रवीण भिशीकर, दिपराज पारडीकर, नरेंद्र भिवापूरकर, जितेंद्र मोहाडीकर, प्रेमलाल भांदक्कर, रमेश पुणेकर, राजेश बोकडे, कल्पक भनारकर, राजेंद्र सोनकुसरे, गजानन भनारकर, छायाताई खापेकर, जिजाबाई धकाते, यशश्री नंदनवार, गीता पार्डीकर, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते  रेखा निमजे, संगीता पौनीकर, मनोहर घोराडकर, विश्वनाथ आसई, हरेश निमजे, मुकेश बाजीराव, हेमराज मौदेकर, ओमप्रकाश पाठराबे, धनराज पखाले, माताघरे, पिंटू सोरते, अरविंद गडीकर, प्रदीप पौनीकर, मनोहर घोराडकर, पंकेश निमजे, देवराव उंमरेडकर, विजय धकाते, संजय बारापात्रे, मिथुन निमजे, मधुकर उमरेडकर, मुकेश बाजीराव प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here