दिनांक ६-७ जानेवारी, २०२४ पोरबंदर गुजरात येथे आयोजित अखील भारतीय सागरी जलतरण स्पर्धेत ३० ते ४५ वयोगटात ४० वर्षीय ईश्वरी वाटकरने ५ किलोमिटर अंतर २ तास ४२ मिनीटात पुर्ण करुन दुसरा कमांक पटकाविला. या स्पर्धेत तिला मेडल स्मृती चिन्हे व रोख बक्षीस देउन गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकंदर देशभरातुन विविध गटात ९५० हुन जास्त जलतरण पटु सहभागी झाले होते.
        ईश्वरी हि निरक्षर महिला असुन नागपूरच्या लेन्ड्रा पार्क मध्ये ती मोल मजुरी व काम करते दिवसभर मजुरीचे काम करुन ती आपला पोहण्याचा छंद जोपासते या अगोदर सुध्दा तिने ब-याच सागरी लांब पल्याच्या स्पर्धा गाजविल्या आहेत. ती अंबाझरी स्विमिंग क्लबची खेळाडू असून भोजराज मेश्राम व मनोहर मुळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ती जलतरणाचा अभ्यास करते तिच्या या यशा बद्दल समाजात तिचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here