12 जानेवारी रोजी संविधान चौकात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन :
    महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती च्यावतीने ४ डिसेंबर पासून राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. संपाच्या निमित्ताने 21 डिसेंबर 2023 रोजी, बेमुदत संपाच्या अनुषंगाने सिटू व हिंद मजदूर सभा यांच्या संयुक्तरीत्या संविधान चौक येथे सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत धरणे निदर्शने आंदोलन करण्यात येत आहेत.
रोज हजारो अंगणवाडी कर्मचारी ह्या धरणे आंदोलनात सहभागी झालेले आहेत. व आक्रमक पद्धतीने आपल्या मागण्यांच्या घोषणांनी संविधान चौक दणाणून सोडत आहेत. कार्यक्रमाचे शेवटी राष्ट्रगीत जाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात येत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे, किमान वेतन 26 हजार रुपये मिळाले पाहिजे, व पेन्शन मिळाले पाहिजे, काल ३७ दिवस होऊनही महाराष्ट्र शासन या महिला कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाहीत. यादरम्यान कोमल विजय गोंधळे आंदोलनातून परत जाताना अपघाती निधन झाले त्यांना त्या धरणे आंदोलनात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हे शासन अजून किती अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बळी घेणार हा सवाल विचारण्यात आला.
अंगणवाडी कर्मचारी हे दिनांक 12 जानेवारीला संविधान चौक येथे रस्ता रोको आंदोलन करणार अशी घोषणा केली. त्याचबरोबर युती शासनाच्या या धोरणामुळे अंगणवाडी सेविका या सरकारला येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत करा हे अभियान घरोघरी जाऊन करतील. असा निर्णय घेण्यात आला. कार्याध्यक्ष विठ्ठल जुनघरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here