महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित असलेले नागपूर शहरातील साहेबांच्या हस्ते अविनाश दादा जाधव (मनसे नेते) संदीप दादा देशपांडे (मनसे नेते) राजू उंबरकर (मनसे नेते), विशाल बडगे (शहराध्यक्ष) व चंदू लाडे (शहराध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर उपशहर अध्यक्ष पश्चिम व दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातील उपशहर अध्यक्ष पदावर तुषार गिऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली. उत्तर व पूर्व विधानसभा उपशहर अध्यक्ष या पदावर गौरव पुरी यांची नियुक्ती करण्यात आली. मध्य व दक्षिण नागपूर विधानसभा उपशहर अध्यक्ष या पदावर शशांक गिरडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मध्य नागपूर विभाग अध्यक्ष या पदावर सुमित वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली. दक्षिण पश्चिम मतदार संघ विभाग अध्यक्ष या पदावर हर्षद दसरे यांचे नियुक्ती करण्यात आली तर पश्चिम मतदार संघाचे विभाग अध्यक्षपदी नितीन वाकोडे यांची नियुक्ती करण्यात आली. उत्तर नागपूर विधानसभा विभाग अध्यक्षपदी सुनिल गवई यांची नियुक्ती करण्यात आली व सर्वांना पुढील वाटचालींकरिता शुभेच्छा देण्यात आला. अशी माहिती चेतन बोरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here