नागपूर: दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ व तरुणांचे आदर्श व स्फूर्ती देणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती एडूसन फाउंडेशन, नागपूर तर्फे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक निलेश काळे, मुख्य अतिथी समाज कल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी हृदयजी गोडबोले, समतादुत दिक्षा पवार, शुभांगी टिंगणे उपस्थित होते. सर्वप्रथम सर्वत्र राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. हृदयजी गोडबोले यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन केले व पालकांना जात प्रमाणपत्र पडताळणी याबाबत सविस्तर माहिती दिली. समतादुत दिक्षा पवार यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर व्याख्यान दिले. शुभांगी टिंगणे यांनी जात पडताळणीला लागणारे कागदपत्रे याबाबत माहिती दिली. उपस्थित विद्यार्थ्यांनीही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित व्याख्याने सादर केली. कार्यक्रमाचे संचालन सरोज काळे यांनी तर उपस्थितांचे आभार निलेश काळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here