दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंगरोड येथील महाकाली नगर चौकात माँ जिजाऊ डेअरीच्यावतीने १२ जानेवारी रोजी  किशोर पवार यांच्या उपस्थितीत राजमाता, माँ जिजाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे गजानन शेळके व दक्षिण नागपूर भाजपचे वार्ड अध्यक्ष (क) बाबारावजी तायडे यांच्या हस्ते माँ जिजाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. डेअरीचे मालक किशोर पवार यांनी जिजामातेवर आपले विचार मांडले ते म्हणजे जिजामातांनी शहाजी राजे यांच्या खांद्याला खांदा लावून परकीय आक्रमणांना तोंड दिले. ती म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजामाता जाधव घराण्यात असून भोसल्यांच्या घराण्यात गेल्या. जिजाऊ मातेचा जन्म 12 जानेवारी रोजी सिंदखेड राजा, बुलढाणा येथे झाला. जिजाऊने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी शहाजीराजे भोसले यांच्या सोबत विवाह झाला. संभाजी आणि शिवाजी असे दोन पुत्र होते. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. मातेने शिवबा ला पराक्रमी बनवले आणि आज ते जगजाहीर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाते. राजमाता जिजाऊ पराक्रमी, धाडसी, स्वाभिमानी, असून जनतेच्या उद्धाराकरिता राजसत्ता मिळविण्या करिता शोषित, पीडित, समाजाला न्याय देण्याकरिता, जिजामातेने आपले संपूर्ण आयुष्य घातले. म्हणूनच राजमाता राष्ट्रमाता ठरल्यात. असे पवार यांनी व्यक्तव्य केले. यावेळी मातोश्री जिजाऊंच्या प्रतिमेला प्रामुख्याने उपस्थित राहून सर्वांच्या हस्ते आंदराजली वाहिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख पाहुणे भाजपचे महामंत्री गजानन पांडुरंग शेळके, किशोर पवार, दीपक खेडकर, बाबाराव तायडे, विकास हिंगे, मामा राऊत, शाहू पवार, मोतीराम सिरसाम, दिनकर गोतमारे, मडावी साहेब तसेच श्रीमती चंदाताई किशोर पवार, सही पवार, संचिता बेसरवार आणि जेष्ठ कांदे आजी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here