गोंदिया :-  गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पोस्टीक तृणधान्य अभियाना अंतर्गत जिल्हा कृषी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोष्टिक अन्नदानाचे उत्पादन होत, असते त्याच बरोबर विविध प्रकारच्या भाजीपाल्याच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि जिल्ह्यात पोस्टीक अन्नदानांच्या पुरवठा व पौष्टिक धान्याची ओळख होण्यासाठी जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
        गोंदिया जिल्हा हा कृषी विभागात मागासलेला जिल्हा म्हणून ओळख होती मात्र ही ओळख सध्या पुसण्याचे काम जिल्ह्यातील कृषी विभागात सरसावला असून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या फळभाज्या नाविन्यपूर्ण असे उत्पादन आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचे भाजीपाला यांचं उत्पादन करावं तसेच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चेरी रामफळ सिताफळ हनुमान फळ यासारखे विविध वैशिष्ट्यपूर्ण फळांचे सुद्धा उत्पादन होत आहे. यांची माहिती सर्वसामान्य लोकांना पोहोचावे याकरिता कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी महोत्सवात आत्मा कृषी विभाग सारख्या विविध संघटनांनी यामध्ये भाग घेतला आणि 200 च्या वर स्टॉल लावत नवीन पौष्टिक वस्तूंची माहिती फळांची माहिती आणि भाजीपाल्यांची माहिती आणि यांच्या तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी विभागांनी यावेळी केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here