नागपूर : आरोप मनोज श्यामलाल डोंगे यांची सन्मानीय अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी, नागपुर यांच्याद्वारे निर्दोष मुक्त करण्यात आले. आरोपीवर अन्न भेसड कायदा अनंव्ये u/s १६ (१) (a) (i) व रूल ३२ (c) (e) अंतर्गत आरोप होते.
सरकार पक्षाचे असे कथन होते की, आरोपी मनोज यानी व त्यांचे वडिल श्यामलाल यानी यांचे मालिकीचे नेशनल सोडा फैक्टरी येथे भेसड़ युक्त कार्बोनेटेड वाटर चे प्रतिबधक बोटल तयार केले व सदर बाटली अन्न भेसड अधिकारी यांच्या मार्फत जप्त करण्यात आले. सदर बाटली रासायनिक प्रक्रियेसाठी पाठवुन त्याचा अहवाल प्राप्त झाला व आरोप मनोज व त्यांचे वडिल श्यामलाल विरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपी विरुद्ध प्रकरण चालविन्यात आले. दरम्यान एकंदरित सरकार पक्षा द्वारे तक्रारदार व पंच शाक्षीदार तपासन्यात आले. सरकार पक्ष आरोपी विरुद्ध प्रकरण साबित करू शकले नाही, सदर प्रकरण शुरू असताना श्यामलाल डोंगे यांचा मृत्यु झाला. व सबल पुराव्या अभावी मनोज डोंगे यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. आरोपीच्या वतीने  राजेंद्र साहू,  गुरप्रीत सिंग चंडोक,  योगेश हसोरिया,  पराग कुसरे, ऋषभ मोजंनकर, गौरव साहू यानी बाजू मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here