नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र मंदिर – न्यास अधिवेशनास मंदिर विश्वस्तांचा उत्स्फूर्त पाठींबा !
 नागपूर, 15 जानेवारी – येथील सेमिनरी हिल्स, मानवसेवा नगर च्या हिलटॉप दुर्गामाता मंदिर येथे मंदिर विश्वस्तांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ९ मंदिरांचे २५ विश्वस्त उपस्थित होते. ४ फेब्रुवारीला श्रीराम सभागृह, नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र मंदिर – न्यास अधिवेशनाची माहिती देण्यासाठी हिलटॉप दुर्गामाता मंदिरच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीला या अधिवेशनासंबंधी माहिती देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
      बैठकीला संबोधित करताना हिंदु जनजागृती समितीचे श्री. विद्याधर जोशी म्हणाले ‘मंदिरे हिंदु संस्कृतीचा पाया आहे. पाया मजबूत असणे आवश्यक आहे. परंतु सध्यस्थितीत मंदिरे दिशाहीन आहेत. त्यांच्या समस्या समोर येत नाहीत. मंदिरांच्या समस्या दूर होऊन मंदिरे सक्षम व्हावी आणि पुन्हा हिंदूंसाठी मार्गदर्शक केंद्रे व्हावी यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक आहे.’ यावेळी श्री. दिलीप कुकडे यांनी उपस्थित विश्वस्तांना अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
      भाजप नगरसेवक श्री. नरेश बेर्डे यांनी 25 मंदिरांकरिता वस्त्रसंहितेचे मोठे फलक तयार करून दिले. हिलटॉप दुर्गामाता मंदिरच्या वतीने त्यांचे वितरण करण्यात आले. यासोबत आतापर्यंत नागपूरमध्ये एकूण ४७ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली आहे.
        या बैठकीला महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नागपूर जिल्हा निमंत्रक श्री. दिलीप कुकडे, अधिवक्ता ललित सगदेव, भाजप माजी नगरसेवक श्री. नरेश बेर्डे आणि माजी नगरसेवक सुनील अग्रवाल यांची उपस्थिती होती.
 क्षणचित्रे : अ. उपस्थित मंदिर विश्वस्तांनी अधिवेशनाला येण्याची सिद्धता दर्शवली. त्यासाठी त्यांनी लगेच नाव नोंदणी केली.
  आ. मंदिर विश्वस्तांचा परस्पर परिचय व्हावा, संपर्क यंत्रणा निर्माण व्हावी यासाठी विविध भागातील मंदिर विश्वस्तांसाठी ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करण्याचे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here