अयोध्या येथे भगवान श्री. रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा सोमवार दि. 22/1/2024 ला होत असतांना नागपूरच्या श्री गणेश मंदिर टेकडी संस्थेने या कार्यक्रमाच्या समारंभात खारीचा वाटा उचलून कार्यकमाची शोभा वाढविली आहे. दिपावली उत्सव मंदिरात होणार आहे. अत्यंत सुंदर आरास ” श्री ” ला व मंदिरात फुलांची शेज करणार आहे. भक्तांकरीता अयोध्या प्राणप्रतिष्ठाचे एल.सी.डी. प्रोजेक्टवर थेट प्रसारण दाखविण्यात येणार आहे. याच दिवशी अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा च्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून शुभ मुहूर्त असल्याने श्री गणेश मंदिरात मुख्य सुवर्ण कलश मानसी व मानिस देशमुख यांचे हस्ते लावण्यात येणार आहे. मंदिरात धर्मध्वजा आरोहण भक्ताचे हस्ते  निता व श्री. प्रविण माने यांचे हस्ते होणार आहे. श्री गणेश मंदिर टेकडी येथे पूजा सकाळी 8 वा. पासून दुपारी 12.30 वाजे पर्यंत संकल्प, श्री गणेश पूजन, पूण्याह वाचन, अग्नी स्थापन, देवता पूजन, स्नान विधी, ग्रह होम देवता, होमबलीदान, पूर्णाहूती, कलश स्थापन धर्मध्वजा आरोहण, आरती व प्रसाद वितरण करण्यात येईल. त्यानंतर मंगल वाद्ये व बॅड पथकाने आनंद साजरा करण्यात येईल.
वेद आचार्य श्री विवेक दाणी व पाच सहकारी पौरोहीत्या द्वारे करण्यात येईल. नागपूरच्या रामकृष्ण मठाचे संन्यासी श्रीमत् राघवेंद्र नंदजी महाराज, अध्यक्ष श्री रामकृष्ण मठ यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. रात्री 1008 पणत्या लावून दिपोत्सव साजरा होणार आहे. संध्याकाळी 7.00 वा. नागपूरचे प्रसिध्द शेफ श्री. विष्णुजी मनोहर यांचे हस्ते  “श्री ” ची आरती व शीरा प्रसाद वितरण होणार आहे.

तसेच मंगळवार दि. 23 जानेवारी 2024 रोजी  उमा व श्री. गोपाल कटारा श्री. किसनगोपाल चुन्नीलाल गांधी यांचे हस्ते श्री. गणेश पूजन, कलश पूजन आरती व प्रसाद वितरण करण्यात येईल. मो. 9890334888 तरी भक्तांनी जास्तीत जास्त संख्येत लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. विकास ए. लिमये, उपाध्यक्ष श्री. माधव कोहळे, सचिव श्रीराम कुळकर्णी, सहसचिव श्री. अरूण व्यास, कोषाध्यक्ष श्री. दिलीप शहाकार, विश्वस्त श्री. अरूण कुळकर्णी, श्री. शांतीकुमार शर्मा, श्री. के.सी. गांधी, श्री. लखीचंद ढोबळे, श्री. संजय एस. जोगळेकर श्री. हरी लक्ष्मण भालेराव यांनी केले. वरील कार्यक्रम सफल करण्यात खालील भक्तांनी सहकार्य करणार आहे. देवेंद्र देहेरीया, संजय घोडे, राजेश भालेराव, प्रकाश जाधव, मकरंद कोहळे, विक्रम वाघ, अनिल मोटघरे, मितेश खत्री, अमित गुप्ता व श्री | गणेश मंदिराचे कर्मचारी गण इत्यादी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here