नागपूर :  जीवन उन्नती अभियान अंतर्गत महिला बचत गटांना समाज कल्याण विभागामार्फत कृषी ट्रॅक्टर योजनेच्या अंतर्गत बचत गटांची फसवणूक केल्या संदर्भात माधुरी संतोष गिरसावरे यांनी पत्रकारांना सांगितले की, समाज कल्याण विभागामार्फत महिला बचत गटांना पुरवण्यात आलेल्या कृषी अवजारे संच पुरवठा पुरवठ्यात घोटाळा झाल्याची धक्कादायक बाप ओळखीस आली आहे या प्रकरणाची तातडीने दखल घेत समाज कल्याण विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे समाज कल्याण विभागामार्फत 21 22 मध्ये जिल्ह्यातील शंभर महिला बचत गटांना कृषी अवजारे देण्याची योजना आखण्यात आली होती यासाठी खनिज प्रतिष्ठान मधून आठ कोटी एकत्र लाखाचा निधी मंजूर करण्यात आला प्रत्येक महिला बचत गटाला आठ लाख 71000 चे साहित्य देण्यात येणार होते सर्व तालुक्यातील महिला बचत गटांची यासाठी निवड करण्यात आली परंतु उमरेड तालुक्यातील महिला बचत गट गटांना साहित्य मिळालेच नाही याबाबतची तक्रार महिला बचत गटांनी विभागीय आयुक्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली त्यांनी संबंधित तक्रार समाज कल्याण विभागाकडे वर्ग केली मिळालेल्या माहितीनुसार साहित्य पुरवठा करण्याचे काम श्री साई ट्रेडिंग एजन्सी या कंपनीलादेण्यात आले होते हे साहित्य 90 टक्के अनुदानावर देण्यात आले दहा टक्के रक्कम भरल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात टाकण्यात आली कंपनीने बचत गटाकडून त्यांच्या पासबुकावरील दोन कोऱ्या चेक वर मंजुषा चंद्रशेखर टोंगे मांगली यांनी कोऱ्या चेकवर सह्या घेऊन ठेवलेल्या होत्या.
खात्यात रक्कम जमा झाली आणि ती लगेच काढण्यात आली अशी माहिती सूत्र कुठून मिळाली पुरवठ्‌या दाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परतलेले तर काही साहित्य अर्धवट असून ते धूळ खात असल्याचे समजते त्यामुळे बचत गटांना काहीच साहित्य मिळाले नाही या मोठा घोटाळा असून त्यात अनेकांचा समावेश असल्याची चर्चा पुढे आली असून यावेळी चांपा मांगली उमरे रोड येथील बचत गट आणि खापरी येथील नियीती महिला बचत गट यांनी पुढाकार घेऊन या प्रकरणासंदर्भात मंजुषा टोंगे व तिच्या सोबत शासनाचे अधिकांऱ्याना घेऊन फसवणूक केली यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मांगली येथील माधुरी संतोष गीरसावरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here