शासनाने जी आर न काढल्यामुळे सीटूच्या आशा व गटप्रवर्तकानी केले संविधान चौकात धरणे
        २१ जानेवारी पर्यंत शासनाने जीआर न काढल्यास २२ जानेवारी रोजी, सकाळी ११ वाजेपासून २३ जानेवारी रोजी ११ वाजेपर्यंत सीआयडी संलग्न आशा व गटप्रवर्तक काळे वस्त्र धारण करून संविधान चौकात शासनाने घोषित केलेल्या दिवाळीचा निषेध करत काळी दिवाळी साजरी करणार.
मंदिर निर्मितीला आमचा विरोध नसून लाखो करोडो रुपये मंदिर बांधकामा करता खर्च करणाऱ्या केंद्र शासनाच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत आधी योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या तसेच आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या निर्णयाचा जी आर काढा. याकरता आंदोलन केल्या जात आहे. अशी घोषणा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सी आय टी यू चे अध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे यांनी संविधान चौकातील सभेत बोलताना सांगितले. त्यानंतरही शासनाने दुर्लक्ष केल्यास विविध मंत्री व आमदारांना त्यांच्या घरी जाऊन घेराव करण्याच्या निर्णय घेण्यात आला. देशात जातीय सलोखा अबाधित राहावा, महिलांवरील व दलीत – आदिवासी वरील अत्याचार बंद व्हावे, महागाईला आळा घालावा, नवीन कामगार कायदे रद्द करावे, ईव्हीएम चा आधार घेऊन निवडणुकीत घोळ करणाऱ्या शासनकर्त्यांचा निषेध करत ईव्हीएम वरील होणारे पुढील मतदान थांबवून बॅलेट पेपर वर मतदान घ्यावे असे त्यांनी सांगितले. आशा व सुपरवायझर ( गटप्रवर्तक ) कर्मचारी युनियन ( सी आय टी यू ) नागपूर जिल्हा तर्फे संविधान चौक  येथे आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी २३ दिवस संप केला. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसें दिवस कामाचा दबाब वाढवण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण होत आहे. मागील महिन्यात राज्यभर आशा व गटप्रवर्तक त्यांनी २३ दिवस संप केला. सरकारने काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्याची पूर्तता न केल्यामुळे परत १२ जानेवारी पासून संपावर आहेत. त्या अनुषंगाने सी आय टी यू तर्फे १७ जानेवारी रोजी संविधान चौकात धरणे आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. राजेंद्र साठे, कॉ. प्रीती मेश्राम व कॉ. रंजना पौनिकर करणार धरणे आंदोलनात हजार चे वर आशा वर्कर व सुपरवायझर उपस्थित होत्या.
                   मागण्या
(१) आशा व सुपरवायजर यांना ५ हजार दिवाळी बोनस द्या.
(२) गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा.
(३) आशा – सुपरवायजर यांना ऑनलाइन डाटा एन्ट्री सक्ती करू नये.
(४) आशा व सुपरवायझर यांना किमान वेतन देण्यात यावे.
(५) आशा सुपरवायझर यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे समायोजित करण्यात यावे.
(५) सी एच ओ नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्कर ला आरोग्य वर्धिनीचा निधी मेडिकल ऑफिसर च्या सहीने देण्यात यावा.
(६) आशा सुपरवायझर यांना १५०० रु. महिना आरोग्य वर्धीनी निधी देण्यात यावा.
(७) शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये.
(८) लाभार्थीची माहिती सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मागवण्यात यावी. इतर वेळेस मॅसेज  किंवा फोन करू नये.
(९) डेंग्यू, क्षयरोग, कुष्ठरोग कामाचा २०० रू. रोज देण्यात यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here