समृद्धी महामार्ग वरती 1 जुलै 2023 रोजी झालेल्या भीषण अपघातात 20 परिवारातील 25 लोकांचा दुर्दैवी होळपळून मृत्यू झाला होता. या अपघाताला साडे सहा महिने म्हणजे जवळपास 200 दिवसांचा कालावधी लोटला आहे. या अपघाताची झळ संपूर्ण महाराष्ट्राला बसली होती यामध्ये बहुतांश मृतक हे वर्धा तथा नागपुर जिल्ह्यातील होते. सदर अपघात भीषण आणि दुर्दैवी असल्याने तत्कालीन वर्धा जिल्हा पालकमंत्री तथा वित्तमंत्री वर्तमान गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर असलेले मा. देवेन्द्रजी फडणवीस यांनी प्रत्येक पिडीत परिवारांना 25 लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा तथा या अपघाताची सखोल चौकशी करण्याची 1 जुलै 2023 रोजी प्रसारमाध्यमांपुढे ग्वाही दिली होती. परंतु त्यांनी केलेल्या घोषणेपैकी प्रत्येक मृतकांच्या परिवाराला फक्त 5 लाख रुपये नुकसानभरपाई राज्य शासन कडून प्राप्त झाली असून उर्वरित 20 लाखांच्या निधीबाबत तथा अपघताची चौकशी करण्याबाबत अद्यापही मौन पाळून आहेत. या संदर्भात मागील साडे सहा महिन्यांपासून पीडित परिवार वेळोवेळी शासन प्रशासन ला निवेदन देऊन स्मरण करून देत आले आहे.
1 जुलै 2023 चे अपघात बाबत 9 जुलै 2023 रोजी सर्वात आधी सुधीर मुनगंटीवार कॅबिनेट मंत्री यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन ला त्यांनी स्वतःचे पत्र लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले, 12 जुलै 2023 रोजी वर्धा लोकसभा क्षेत्र चे खासदार मा. रामदासजी तडस यांनी निवेदन स्वीकारले व लोकसभेत 377 अंतर्गत याची चर्चा केली, 20 जुलै 2023 रोजी वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पीडितांच्या परिवारांशी सविस्तर चर्चा करून निवेदन स्वीकारले, वर्धा विधानसभा आमदार डॉ. पंकज भोयर यांनी 23 जुलै 2023 रोजी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी लावून प्रश्न उपस्थित केला, त्यावर काहीही निष्पन्न न झाल्याने 15 ऑगस्ट 2023 रोजी अपघाताच्या 45 व्या दिवशी सर्व परिवारातील सदस्यांनी एकत्र येऊन “भावपूर्ण श्रद्धांजली” चा कार्यक्रम वर्धेत आयोजित करून खासदार, आमदार व जिल्हाधिकारी वर्धा यांना प्रश्न विचारून घटनेबाबत तथा दिलेल्या निवेदन बाबत माहिती विचारली परंतु तिघांनीही उत्तर नकारात्मक दिले. 30 ऑक्टोबर 2023 रोजी अपघातातील तपास बाबत संभ्रम असल्याने तथा फडणवीस साहेबांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी न झाल्याने हिवाळी अधिवेशन पासून साखळी उपोषण सुरू करणार असल्याचा ईशारा जिल्हाधिकारी वर्धा यांना दिला, परंतु त्यांनी तथा शासनाने या ईशाऱ्याची गंभीरपणे नोंद न घेतल्याने नागपूर हिवाळी अधिवेशन च्या पहिल्या दिवशी 7 डिसेंबर 2023 पासून साखळी उपोषणास जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे 25 मृतकांच्या परिवारांनी सुरुवात केली. दि. 8 डिसेंबर 2023 रोजी विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांची नागपूर येथे पिडीत परिवारातील शिष्टमंडळाने भेट घेऊन हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्याबाबत विनंती केली. त्यांनी 13 डिसेंबर 2023 रोजी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे सभागृहात मुद्दा उपस्थित केला परंतु त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दाला सभागृहाने गंभीरपणे घेतले नाही, 9 डिसेंबर 2023 रोजी महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी वर्धा दौऱ्यावर असताना पीडित परिवारांच्या शिष्ठमंडळ सोबत विशेष बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या परंतु समाधान मात्र करू शकले नाही, 18 डिसेंबर 2023 रोजी निराश होऊन सर्व परिवारांनी आणि वर्धेतील सामाजिक संघटनांनी मिळून वर्धेत “भव्य मुकमोर्चा” काढून शासनाचा निषेध नोंदवला. साखळी उपोषणाला 30 दिवसांचा कालावधी लोटूनही कोणत्याही शासन प्रशासनातील मंडळींनी साधी भेटही उपोषणकर्ते परिवारांची घेतली नसल्याने 5 जानेवारी 2023 रोजी “शर्म करो” एकदिवसीय धरणे आंदोलन करून शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न वर्धा जिल्ह्यात केला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार वर्धा जिल्हा दौऱ्यावर असल्याने त्या दिवशी पीडितांच्या परिवारातील सदस्यांनी विश्रामगृह येथे भेट घेतली असता त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांपुढे घोषणा केलेल्या 1 जुलै 2023 रोजीचा व्हिडीओ बघितला तथा फडणवीस साहेबांनी घोषणा केली असल्याने मान्य केले. देवेंद्र फडणवीस यांच्याशी गंभीरपणे चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.सोबत सदर अपघात गंभीर असल्याने यावर 2/3 दिवसांत चौकशी समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले. न्यायाच्या मागणी करिता पीडितांच्या परिवारांना 30 दिवस पासून साखळी उपोषणाला बसावे लागले हे शासनाकरिता शरमेची गोष्ट असल्याची कबुली मुनगंटीवार यांनी सर्वासमक्ष दिली.
मुनगंटीवार यांना निवेदन देऊन 12 दिवसांचा कालावधी लोटला असून साखळी उपोषणाला 42 दिवस पूर्ण झाले आहे,परंतु शासन प्रशासन तर्फे मागण्यांना अनुसरून कोणत्याही स्वरूपाचे पत्र प्राप्त झाले नाही, महाराष्ट्रातील सर्वच दिग्गज मंडळींनी निवेदन स्वीकारून चर्चा केली आणि प्रत्येकांनी पीडित परिवारांना सकारात्मक प्रतिसाद दिला परंतु कोणाकडूनही निर्णायक निकाल मिळाला नाही . सरतेशेवटी सर्व देश प्रभू श्रीराम यांच्या चरणी नतमस्तक असून शासनातील मंडळी त्यांच्याच जयघोषात व्यस्त आहे. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे रामभक्त असून त्यांच्या जनसंपर्क कार्यालायपुढे नागपूर येथे 25 मृतकांच्या कुटुंबातील सदस्यांनी मिळून ‘रामनाम जप केल्यास त्यांना पीडितांच्या भावना कदाचित कळतील ही परिवारांची समज आहे. राम नाम चा 1100 वेळ जप केल्यास नक्कीच त्यांच्या समस्यांचे आणि शासनाने केलेल्या घोषणांचे काहीतरी समाधान मिळेल हा मृतकांच्या परिवारांचा 100% विश्वास आहे. राज्यपाल, खासदार, आमदार, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेता, जिल्हाधिकारी वर्धा जिल्हाधि कारी नागपूर यांनी निवेदन ला स्वीकारले या बद्दल आभार मानले परंतु यांना पीडितांच्या मागण्या निकाली काढण्यात किंवा यांचे 42 दिवसांपासून चालू असलेले साखळी उपोषण थांबविण्यात यश मिळाले नाही त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री व तत्कालीन वर्धा जिल्हा पालकमंत्री, वित्तमंत्री पदावर असलेले  देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालय पुढे नागपूर येथे मृतकांच्या सर्व कुटुंबातील सदस्यांनी रामनाम जप करण्यासाठी कंबर कसली आहे.

19 जानेवारी 2024 रोजी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालय पुढे “राम नाम जप” करण्यासाठी स्वतःहून जाऊ. राम नामच सत्य असल्याने त्याचाच सहारा घेऊ.” असे मत कुटुंबातील सदस्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पत्रकार परिषदेत संजय गुप्ता, कल्पना गुप्ता, रसिका मार्कंडे, परिजा मार्कडे, निरु सोमकुवर, अजहर शेख, मदन वंजारी, मीना वंजारी, ओमप्रकाश गांडोळे, दिनकर खेलकर, रामदास पोकळे, निलिमा खोडे, निलू तायडे, शंकर गोठे, अजय जानवे, चंद्रशेखर मडावी, निहाल पांडे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here