दिवंगत आशादेवी गोविंद प्रसाद जयस्वाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त
नागपूर: कोराडी ( १७ जाने ) कलचुरी एकता सर्ववर्गीय संघ महाराष्ट्र प्रदेश नागपूरतर्फे सामूहिक विवाह सोहळा आयोजित केलेल्या कार्यक्रमात महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे 24 जोडप्यांचा सामुहिक विवाह व परिचय संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विवाह योग्य युवक-युवती परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती याप्रसंगी 24 जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळा आणि परिचय संमेलन संपन्न झाले. या कार्यक्रमाप्रसंगी समाजाचे कोराडी येथील अरुण उजवणे सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठे योगदान दिले व त्यांचा सत्कार ही करण्यात आला. कलार -कलवार समाजातील या कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. सर्व संघटनेने मोठ मोठ्या वस्तू देणगी देऊन सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजेश पशिने आणि पायल बिपीन नशिने यांनी केले तर आभार सतेंद्र भारद्वाज यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here