नागपूर : (१८ जानेवारी) भवानी नगर पारडी नागपूर येथील शिवशक्ती हनुमान मंदिराचा भव्य अभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात सुरु झाला आहे. यावेळी मंदिराचे महंत श्री श्री 1008 श्री. शिवगिरी मोजगिरी महाराज यांचे पूजन, हवन त्यांचे शिष्य डॉ. पुरुषोत्तम गिरी महाराज करीत आहेत.  प्राचीन शिवशक्ती हनुमान मंदिराचा हा जीर्णोद्धार उत्सव भव्यदिव्य करण्यासाठी व्यवस्थापन समिती, महिला समिती व युवक समितीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभत आहे.  सकाळपासूनच सर्व भाविक सेवेसाठी सज्ज झाले आहेत.  विशेषत: डॉ. हेमंत सोनी, कुलवती शिवहरे, पांडे पनीरवाले, मनोज वर्मा, संजय तिवारी, डॉ. शिवम दुबे, डॉ. राहुल पांडे, आशा तिवारी, डॉ. नेहा यादव, तरुणा रहागंडाले, गुणन चौधरी, अतुल भोयर, परप्रांतीय, डॉ. नितीन बेलखेडे, गीता भारती, डॉ. देवेंद्र बेलखेडे, पूजा ठाकूर, जयनारायण दुबे मोठ्या उत्साहात सहभागी होत आहेत.  अशी माहिती राकेश भारती यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here