*नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर*
सिंधुदुर्ग येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत नाशिकच्या दिव्यांग अंजना प्रधान यांना सुवर्ण पदक प्राप्त.
दि. 15, 16 आणि 17 डिसेंबर 2023 रोजी आयोजित जलतरण महोत्सवात,
       सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा मालवण चिवला बीच येथे आयोजित करण्यात आलीं होती.
                 मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत नाशिकच्या कु. अंजना रंगलाल प्रधान यांना दिव्यांग ओपन महिला गटातून प्रथम क्रमांक मिळाला.स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पर्धेला लाभला होता. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणास  आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके, चषक, मेडल, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
अंजना चा सराव मा.घनश्याम कुवर यांनी करवून घेतला. यासाठी अंजना ला वेळोवेळी गरुडझेप, सक्षम, प्रहार क्रांती संघटना, स्वाधार संस्था,रॉयल रायडर्स बुलेट ग्रुप, नाभिक आरक्षण समिती यांचे मार्गदर्शन वर प्रोत्साहन  लाभले.
        यावेळी जलतरण संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक परब, मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,  माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत,महेश जावकर, बाबी जोगी,बाबा परब,राजेंद्र पालकर, दिपा शिंदे, सुधाकर शानबाग आदींसह जलतरण संघटनेचे पदाधिकारी, स्पर्धक, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशामुळे अंजना चे विविध स्तरातून कौतुक होत आहे. तसेच अंजना प्रधान ह्या आपल्या व्यंगावर मात करून विविध क्षेत्रात अनेक वेळा मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पारितोषिकं मिळवून, हेच सिद्ध करून दाखवतात, की व्यक्ती हा शारीरिकदृष्ट्या नाही तर माणसिकदृष्टया सुदृढ असला पाहिजे. त्यांच्या गौरवाचा सर्वत्र सन्मान होतं आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here