*नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर*
धुळे जिल्हयातील शिरपूर येथील विकास सेन यांनी  उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच  आपल्या बहिणींचे लग्न, छत्रपती शिवकालीन व आध्यात्मिक वातावरणात गठबंधन सोहळा पार पाडून जण जागृतीचा आगळावेगळा  मौल्यवान प्रयत्न साकार केला.
नवदाम्पत्याचे आध्यात्मिक पद्धतीने नवजिवनात पदार्पण. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अध्यात्मिक,धार्मिक वातावरणात होणारा विवाह सोहळा शिरपूर शहरात प्रथमतःच उत्साहात साजरा करण्यात आला.
                     शिरपूर शहरातील जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे  संस्थापक अध्यक्ष विकास सेन यांची बहिण चि.सौ.का.पुजा मधुकर सेन ची.  लोकेश हरिश महाले  इंदौरकर यांच्या विवाहप्रसंगी दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी डि.जे.बॅन्ड न लावता इतिहासात नोंद व्हावी अश्या अध्यात्मिक,धार्मिक वातावरणात महंत सतिष दास भोंगे महाराज व भगवताचार्य प्रमोद भोंगे महाराज यांच्या मार्गदर्शनाने   शिरपूर तालुक्यातील सांप्रदायिक  वारकरी, टाळकरी व एकतारी भजनी मंडळी च्या अप्रतिम सहकार्य च्या माध्यमातून विवाह सोहळा संपन्न झाला.
करवंद, वाघाडी, अजंदे, दहिवद, बाळदे, गिधाडे, खर्दे खु:,बाभुळदे, बोरगाव, सावळदे, निमझरी, अर्थे ब्रु,खामखेडा, भटाणे, वनावल, जातोडा,हिंगोणी,शिंगावे,जुने भामपुर,आंबे प्र खामखेडा,कुरखळी,भोईटी,  चिंचवापाणी,चिलारे,विखरण, बलकूवा,वरुळ,कुवे,बोराडी तसेच शिरपुर शहरातुन श्रीराम मंदीर, वरवाडे,करवंद नाका भजनी मंडळ,या सर्व गावांची भजनी मंडळांनी करवंद नाका जवळील चांमुडामाता मंदीरापासुन  भजनाच्या तालावर गायन करत नाचत नाचत ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करत वधु वरांना स्वा.सै.शंकर नाना मंगल कार्यालय शिरपुर पर्यंत आणले तसेच संत सावता माळी हरिपाठ महिला मंडळ व गिधाडे हरिपाठ महिला मंडळाने ही विशेष सहभाग घेतला होता यात ह.भ.प.घमदास महाराज जय सिया राम चैतन्य आखाडा विरवाडे,ह.भ.प.पिंटु महाराज शिवपंथी आखाडा रोहिणी,ह.भ.प. सुकाराम महाराज शिवपंथी आखाडा वरडी विशेष उपस्थिती होती अक्षरक्षा पंढरीचे स्वरुप तयार झाले होते अश्या प्रकारचे लग्न सोहळे फक्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातच बघायला मिळत असे परंतु या शिरपूर सुवर्ण नगरीत जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा.राज्य  चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन यांनी त्यांच्या बहिणी चे लग्न अध्यात्मिक,धार्मिक,सांस्कृतिक स्वरूपाचे करून सर्व जाती धर्मातील बांधवांच्या मनात एक नवीन आदर्श निर्माण करून शिरपुर शहरात नविन आदर्श रचला आहे पहिल्यादांच वधु वरांचे शिरपूर शहर व तालुक्यातील वारकरींनी  गायनाव्दारे,नाचत गाजत टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत केले व या नव दामपत्यांस शुभ आशीर्वाद दिले. या सर्व कार्यास वृध्द कलावंत मानधन योजना धुळे जिल्हा समिती सदस्य भागवताचार्य ह.भ.प.प्रमोद भोंगे महाराज,वारकरी साहित्य परिषद तालुकाध्यक्ष ह.भ.प.संजय पाटील महाराज ,भाजपा अध्यात्मिक संघटना शहराध्यक्ष संतोष माळी यांनी विशेष सहकार्य केले  तरी सर्व परिसरातुन विशेष तरुण पिढीसाठी या दाम्पत्यांनी एक आदर्श उभा केला  कुठलीही महागडी डिजे,वाद्य न लावता वारकरी संप्रदायाच्या  विचाराने प्रेरीत होऊन विवाह उत्साहात आनंदात संपन्न झाला याची चर्चा शिरपूर शहर सह सर्वत्र होत आहे.विकास सेन व त्यांच्या  कुटुंबियांकडून समस्त वारकरी बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
संपुर्ण महाराष्ट्रातील तरुणांनी,नव्या पिढीने असा अध्यात्मिक,धार्मिक पद्धतीने विवाह सोहळा घडवुन आणनार्‍या परिवाराचा आदर्श घ्यावा अशे वक्तव्य लग्न सोहळ्यात उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीने करण्यात येत आहे…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here