नागपूर : वाय.के.ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि योगा लाईफ सेंटरच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवार दि.२३ डिंसेबर रोजी सायंकाळी ४ वाजता. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे.
      कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव आणि दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांची प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार, राष्ट्रीय यंगस्टार पुरस्कार, राष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार, राष्ट्रीय महिला सक्षमीकरण पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणानंतर संगीतप्रेमींसाठी कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम निःशुल्क असल्याचे आयोजक व सेंटरची  सचिव धनश्री लेकुरवाळे हिने पत्रपरिषदेत पत्रकांरांना सांगितले. यावेळी परिषदेत मंचावरील डॉ. प्रेमा लेकुरवाळे, धनश्री लेकुरवाळे, डॉ.नितीश गायकवाड, डॉ.प्राजक्ता लाडूकर मंचावर उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here