शिवशक्ती नगरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा थाटात
नागपूर : दक्षिण नागपूर येथील श्री हनुमान मंदिर पंच कमिटी शिवशक्तीनगर येथील नागरिक व समस्त रामभक्त च्यावतीने रविवारी दुपारपासून शोभायात्रे ला प्रारंभ झाला होता त्यावेळी पालखी, प्रभू श्रीरामचंद्र, माता सीता, लक्ष्मण व रामभक्त हनुमानजी, विठ्ठल, रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभाग होता. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी व गाडगे महाराज, छबरी तसेच इतरही वेशभूषेत होते. शोभायात्रेप्रसंगी मोठ्या संख्येने भक्त गण सहभागी होऊन वस्तीतील वाजत गाजत, नाचत गाजत, जय श्रीरामचे नारे लावत ही शोभायात्रा मंदिरात परत आली. शोभायात्रा सोहळ्यात सर्व रामभक्तानी सहभाग घेऊन शोभायात्रेला उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला.
    सोमवारी 22 जानेवारी रोजी, अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्च्या अनुषंगाने भगवान प्रभु श्रीरामाची व श्री विठ्ठल रुख्मीनीची संगमरवरी व तेजस्वी मुर्त्या ची 22 जानेवारीला सकाळी 12:29 मिनटांनी प्राणप्रतिष्ठा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here