राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण पश्चिम मतदार संघातर्फे विविध ठिकाणी कार्यक्रम व भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
देवनगर, छत्रपतीनगर व मनीषनगर या प्रभागांमध्ये मोठ्या जल्लोषात महाप्रसाद वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण पश्चिम मतदार संघ व व्यापारीसेने तर्फे विविध ठिकाणी भव्य महाप्रसाद तसेच आरती व फटाके फोडून साजरा करण्यात आला.
    22 जानेवारी ला सायंकाळी 5:30 वाजता खामला रोड देवनगर चौक, मनीष नगर भागात व छत्रपतीनगर या भागात मनसे जनसंपर्क कार्यालयातर्फे पूजा पाठ, आरती व महाप्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किशोर सरायकर नागपूर शहराध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे उपशहर अध्यक्ष तुषार गिऱ्हे शहर सचिव श्याम पुनियानी व घनश्याम निखाडे, व इतर मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन तुषार गिऱ्हे यांच्यातर्फे करण्यात आले व त्याकरिता विभाग अध्यक्ष हर्षद दसरे विभाग संघटक चेतन शिराळकर विभाग संघटक व्यापारी सेना चेतन बोरकुटे यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here