नागपूर, दि. 23 जानेवारी
    अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मंदिरातील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद व्यक्त करण्यासाठी काल सकाळी आणि सायंकाळी बेलतरोडीवासीयांनी जोरदार जल्लोष केला. रामरक्षा, शोभायात्रा, महाप्रसाद या उपक्रमांनी बेलतरोडीचा परिसर दुमदुमून गेला.
सकाळी नागोबा मंदिरात उत्सव साजरा झाला. रामरक्षा पठणानंतर  मनीषा धनंजय ताटपल्लीवार यांनी शबरीच्या कथेचे सुंदर विवेचन केले.
      सायंकाळी शोभायात्रा आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नागोबा मंदिर आणि गार्डन कोर्ट सोसायटी येथून दोन शोभायात्रा काढण्यात आल्या. दोन्हीत राम, लक्ष्मण, सीता, हनुमान सजविण्यात आले होते. या शोभायात्रा हनुमान मंदिराजवळ एकत्र आल्या आणि गावातून फिरल्यावर आपापल्या स्थानी विसर्जित झाल्या. या जल्लोषात आजूबाजूच्या सोसायट्यांमधील नागरिक आणि गावकरी उत्साहाने सहभागी झाले होते.
रात्री नागोबा मंदिराजवळ झालेल्या महाप्रसादाचा लाभ हजारावर भाविकांनी घेतला. यावेळी आमदार टेकचंद सावरकर यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here