नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने नेत्र व कर्ण तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. अलीकडेच नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य तपासणी शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास ४०० नागरिकांची नेत्र व कर्ण तपासणीसह कर्करोग तपासणी, रक्त चाचणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली. पोलीस कर्मचारी, चालक व इतर लोकांनी तपासणीमध्ये सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन ऋतुजा गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेचे सदस्य डॉ. चंद्रशेखर मोहिते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर डॉ. गिरीश चरडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते, उपप्रादेशिक अधिकारी  सरक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्फाक अहमद व स्नेहा मेंढे, सहायक मोटार वाहन निरीक्षक किशोर हिवराळे, राहुल धकाते, सिद्धार्थ टिपले, डॉ. अजय मुखर्जी, आशिष जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल, शालिनी मेघे हॉस्पिटल, सरस्वती पॅथलॅब, न्यू इरा हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटलच्या टीमने शिबिरासाठी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here