संत ताजुद्दीन बाबा हे सर्वधर्म समभावाचे प्रतिक मानल्या जाते कारण या मंदिरात संपूर्ण धर्माचे लोक बाबांच्या दर्शनासाठी येतात. भारत ही संतांची भूमी आहे. ही बाब संपूर्ण जग जाणतो. त्यामुळे या भारत भुमित कोणत्या-ना-कोणत्या रूपाने प्रत्येक धर्मात संत या भुमित जन्म घेत असतात व सर्वच धर्माच्या संस्कृतीचे जतन होत असते. आज संपूर्ण जग जाणते की भारत हे शांततेचे प्रतिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या भुमित अनेक धर्म जन्माला आलेत त्यामुळेच अनेक संस्कृती दिसून येतात आणि मुख्यत्वे करून एकोप्याने राहतात हाच संत भुमिचा खरा गोडवा आहे. नागपूरातील संत ताजुद्दीन बाबा यांची अपार महिमा आपल्याला पहायला मिळते आणि जगजाहीर आहे. ताजुद्दीन बाबांचा जन्म २७ जानेवारी १८६१ ला नागपूर शहरापासून १५ किलोमीटरवर असलेल्या कामठी या गावी झाला. बाबा एकवर्षाचे असतांनाच त्यांच्या वडिलांचा देहान्त झाला. यानंतर त्यांच्या ९ वर्षाच्या वयातच आईचा सुध्दा स्वर्गवास झाला. यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजीने करून त्यांना लहाण्याचे मोठे केले. ताजुद्दीन कामठीतील मदरशांमध्ये शिकत होते. कामठीतील मदरशांमध्ये अचानक हजरत अब्दुल्ला शाह नावाचे फकीर आले आणि त्यांची नजर (बालक) बाबा ताजुद्दीनवर पडली. त्यावेळेस त्या फकीराने शिक्षकाला विचारले “तुम इनको क्या पढाते हो” शिक्षक स्तब्ध झाले आणि फकीरच म्हणाले यह बालक (बाबा ताजुद्दीन) जन्मसेही सब कुछ सीखकर आया है. इतके बोलुन फकीर तेथुन निघुन गेले. ताजुद्दीन बाबांना त्यांच्या मामांनी १८८१ मध्ये म्हणजे वयाच्या २० व्या वर्षी नागपूरची रेजीमेंट नं. १३ मध्ये भर्ती केले. तीन वर्षांनंतर त्यांना मद्रासमधील सागरला पाठविण्यात आले. मद्रासी पलटनमध्ये अचानक विराण जागेवर संत हजरत दाऊद यांच्याशी भेट झाली आणि संपूर्ण रात्र सोबत भजन-कव्वालीमध्ये तल्लीन झाले. ताजुद्दीन बाबा स्वतः देवांच्या आठवणीत डुबुन रहायचे. असे सांगितले जाते की बाबांची ड्युटी “शस्त्रभंडार” देखभाल करण्यावर होती. बाबा आपला पहारा चोख देत होते, अशावेळी रात्री २ वाजता अचानक इंग्रज कैप्टन त्या जागेची पाहणी करायला आला. पाहणी झाल्यानंतर कैप्टन वापस जायला लागला. काही अंतरावर जात नाही तर त्याला जो शिपाई पहारा (ताजुद्दीन) देत होता तोच शिपाई पुन्हा दिसला. कैप्टनला गुस्सा आला पुन्हा वापस पहिल्या जागेवर गेला तर तीथे पहाले तर तो शिपाई (ताजुद्दीन)आपल्या जागेवरच होता. यानंतर इंग्रज ऑफिसरने बाबांना पेशीसाठी बोलावले व विचारले की आम्ही तुम्हाला दोन-दोन ठीकाणी पहाले. तुम्ही देवाचे अवतार आहात का ? यावर बाबांना घुस्सा आला. परंतु इंग्रज समजले हा शिपाई साधारण व्यक्ती नसून संत महात्मा आहे. हा त्यांचा पहिला चमत्कार दिसून आला. कालांतराने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बाबांची वेगवेगळी हरकते पाहून त्यांच्या आजीने ताजुद्दीनला पुन्हा कामठीला आणले व अनेक डॉक्टरांना दाखविले. परंतु त्यांनी आत्मा व परमात्माची एकरूपता अवगत केल्याचे दिसून आले. काही लोक त्यांना पागल समजायला लागले. परंतु हळूहळू त्यांच्या हातुन अनेक चमत्कार दिसायला लागले. पीडीत लोक आपले दुःख-वेदना बाबांना सांगायला लागले व त्यांच्या नेत्रदृष्टीने बरेही व्हायला लागले. बाबांचे चमत्कार दुर-दुर पर्यंत पसरायला लागले. परंतु काही लोक आपल्या चमत्काराचा चुकीचा फायदा घेत असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी पागल असल्याचे सोंग करने सुरू केले व लोक त्यांच्या हरकतींना त्रासुन पोलिस कंप्लेंट केली व २६ ऑगस्ट  १८९२ ला कामठीच्या कैन्टोनमेन्ट व जिल्हा मॅजेस्टेटने पागलखान्यात पाठविले. पागलखाण्यात लॉकपहध्ये बंद केल्यानंतरही लोकांना बाबा नागपूरच्या अनेक भागात दिसत होते. हा चमत्कार सर्वच मोठ-मोठ्या ऑफिसरच्या लक्षात आला. असे अनेक चमत्कार लोकांना दिसायला लागले व बाबा ताजुद्दीन संत झाले. २१ सप्टेंबर १९०८ ला नागपूरचे महाराजा श्रीमंत राजा बहादुर राधोजीराव भोसले यांच्या प्रयत्नाने बाबांना पागलखान्यातुन मुक्त केले राजाने आपल्या महालात आणले व राजांनी ताजुद्दीन बाबांची सेवा केली. संत ताजुद्दीन बाबा हिंदू-मुस्लिमांचे प्रेरणादायी प्रतिक होते. बाबांची तब्बेत काही दिवसांत खालावली व १७ ऑगस्ट १९२५ ला  श्रीमंत भोसले यांच्या महालात त्यांचा स्वर्गवास झाला. त्यामुळे नाम समाधी म्हणून सक्करदरा येथील श्रीमंत भोसले यांच्या महालात त्यांची समाधी बांधण्यात आली याला “लहान ताजबाग” म्हणतात. इथे हिंदू प्रथेनुसार मोठ्या प्रमाणात आजही पुजाअर्चना केली जाते व अंतिम संस्कार लहान ताजबागपासुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ताजबाग येथे करण्यात आला याला “मोठा ताजबाग” म्हणतात. इथे मुस्लिम पध्दतीने पुजाअर्चना केली जाते. याप्रमाणे “मोठा ताजबाग व लहान ताजबाग” हे दोन्ही पवित्र स्थान भारतभर  प्रसिद्ध आहे या ठीकाणी दोन्ही धर्माचे लोक एकत्र येतात ही नागपूरसाठी गौरवास्पद बाब आहे. संत ताजुद्दीन बाबांनी आपले पाय ज्या-ज्या ठिकाणी रोवले त्या-त्या ठिकाणी दर्गा आपल्याला पहायला मिळते व बाबांचे दर्शन होते. बाबाचे अनेक प्रसिद्ध ठिकाण आहेत यात मोठा ताजबाग, लहान ताजबाग, वाकी, पागलखाना हे प्रसिद्ध ठिकाण आहे. बाबाच्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे संपूर्ण भक्तांना विनंती आहे की वाढते प्रदुषण पहाता बाबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपापल्या पद्धतीने वृक्षारोपण करावे. यामुळे आपल्याला प्रत्येक झाडाच्या पानात, फुलात, फळात व मुळांमध्ये आपल्याला बाबांचे दर्शन अवश्य होईल. संत ताजुद्दीन बाबांना कोटी कोटी प्रणाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here