दि.- २३.०१.२०२३
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची, जिल्हाध्यक्ष व जिल्हा समन्वयकाची, शहराध्यक्षांची ११ ही जिल्ह्यातील प्रतिनिधीची दि. २३.०१.२०२४ ला दुपारी १ वाजता बैठक डॉ. श्रीनिवास खांदेवाले सरांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीत स्व. नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अभिवादन करून व दि. २७.१२.२०२३ ते ३१.१२.२०२३ या ६ दिवसाचे नागपूर व बुलढाणा येथे उपोषण करणाऱ्या १२ सत्याग्रहींचा सत्कार करण्यात आला व खालील आंदोलनाची श्रृंखला जाहीर केली.
दि. २४.०१.२०२४ रोजी विदर्भ व मध्य प्रदेशच्या सीमेवर वडचिचोली येथे “विदर्भ राज्यात आपले स्वागत आहे” असा बोर्ड लावून सावरगाव ता. नरखेड येथे रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. दि. ०४.०२.२०२४ रोजी बहिरम जि. अमरावती येथे विदर्भ सीमेवर विदर्भाचा बोर्ड लावून रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. दि. ०६.०२.२०२४ रोजी पिंपळखुटी जि. यवतमाळ ते तेलंगणा सीमेवर विदर्भाचा बोर्ड लावून रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. दि. ०८.०२.२०२४ रोजी विदर्भ – तेलंगाना सीमेवरील पोळसा येथे विदर्भाचा बोर्ड लावून रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. दि. १०.०२.२०२४ रोजी विदर्भ – छत्तीसगड सीमेवरील देवरी येथे विदर्भाचा बोर्ड लावून रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. दि. १२.०२.२०२४ रोजी विदर्भ- खानदेश सीमेवर बोर्ड लाऊन मलकापूर जि. बुलढाणा सिमेवर विदर्भाचा बोर्ड लावून रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. हि सर्व आंदोलने दुपारी १ वाजता केली जाणार आहेत. “अभी नही तो कभी नही” म्हणून विदर्भाचे आंदोलन भारतीय संविधानातील आर्टिकल ३ प्रमाणे येत्या संसदेच्या अधिवेशनात निर्माण करण्यास आंदोलनाद्वारे बाध्य करण्याकरीता हि आंदोलनांची श्रृंखला केली जाणार आहे.

कोर कमेटीच्या बैठकीला विदर्भ आंदोलनातील विराआंसचे नेते अॅड. वामनराव चटप, दैनिक देशोन्नतीचे प्रमुख संपादक प्रकाश पोहरे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर, डॉ. रमेशकुमार गजबे, प्रभाकर कोंडबत्तूनवार, कृष्णराव भोंगाडे, राजेंद्रसिंह ठाकूर, अरुण मुनघाटे, तेजराव मुंडे, राजेंद्र आगरकर, एड. सुरेश वानखेडे, अशोक पोरेड्डीवार, अंकुश वाघमारे, प्रकाश लढ्ढा, सुनीता येरणे, डॉ. विजय सहारे, नरेश निमजे, मनीषा फुंडे, मंजुषा तिरपुडे, अयुब शेख, ज्योती खांडेकर, मधुसूदन कोवे, रविकांत अढाऊ, मोहम्मद आरिफ, नसीर शेख, घीसू पाटील खुणे, राजेंद्र सतई, सतीश शेंद्रे, उषा लांबट, शोभा येवले, मितीन भागवत, कपिल इद्दे, नीलकंठ घवघवे, अशोक पाटील, निम्बाजी डोईफोडे, रियाज खान, राज ठाकूर सह विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here