आज दिनांक 23 ऑगस्ट, 2023 रोजी सुमारे सायंकाळी 6 वाजता इस्रोचा चंद्रयान-3 मिशन हा यशस्वी झाला. हा मिशन इस्रोच्या वैज्ञानिकांनी अथक प्रयास करून यशस्वी करून दाखविला. आम आदमी पार्टी नागपूरच्या वतीने रमन सायन्स सेंटर समोर व आगारामदेवी चौकात चंद्रयान-3 मिशन यशस्वी झाल्याबद्दल मिठाई वितरित करण्यात आली. यावेळी ढोल ताशा वाजून जल्लोष देखील करण्यात आला. सर्व सर्व नागरिकांना मंगलयान -3 यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन देखील करण्यात आले. हा कार्यक्रम नागपूर अध्यक्ष अजिंक्य कळंबे व राज्य संघटन मंत्री भूषण ढाकूलकर कर यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने डॉ शाहिद अली जाफरी, श्याम बोकडे, रोशन डोंगरे, सोनू फटिंग, शैलेश गजभिये, गौतम कावरे, पुष्पा डाबरे, गिरीश तीतरमारे, कृतल आकरे, पियुष आकरे, विनोद गोर हे उपस्थित होते.
यावेळी आम आदमी पार्टी नागपूर अध्यक्ष अजिंक्य कळंबे यांनी सर्व भारतीयांचे अभिनंदन केले व व देशात अंतरिक्ष क्रांतीची सुरुवात झाली असे सांगितले. ह्या चंद्रयान -3 मिशन नंतर भारत हा जगातल्या चार देशा पैकी एक देश बनला आहे. याआधी अमेरिका, रशिया व चीन हे तीन देश चंद्राच्या मागच्या बाजूला यशस्वीपणे आपले यान पाठवून चुकले आहेत. राज्य संघटन मंत्री भूषण ढाकुलकर यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले व देश हा सदैव इस्रोच्या वैज्ञानिकांचा आभारी राहील कारण इस्रोच्या वैज्ञानिकांमुळे देशाला हा गर्वाचा दिवस लाभला आहे. भारत हा शिक्षा व वैज्ञानिक क्रांतीमुळेच पुढे जाऊ शकेल असे प्रतिपादन देखील त्यांनी केले.
या जल्लोषात अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी देखील शामिल होते. तसेच पंकज मेश्राम, विशाल वैद्य, विनीत गजभिये, दीपक भातखोरे, चेतन निखारे, शिल्पा बागडे, शुभम मोरे, मंजू ताई पोपरे, पायल डोंगरे, पिंकी बारापात्रे, सूचना गजभिये, आकाश वैद्य, विजय धकाते हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here