मनसेला विदर्भात खिंडार बहुसंख्य ओबीसी वंचित मध्ये. 
 
   प्रतिनिधी जळगांव जामोद -महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे राज्य चिटणीस, बारा बलुतेदारांच्या जीवनाचा सखोल अभ्यासक. ८०० वर्षाचे बलुतेदार त्यांचे जीवनमान ह्यावर लिखाण करणारे, स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचे दिग्दर्शक, बारा बलुतेदार महासंघाचे राज्य प्रवक्ता, मनसे माथाडी कामगार सेनेचे माजी विदर्भ संपर्क नेते, भाकर मराठी चित्रपटचे लेखक/दिग्दर्शक/निर्माता, १९९३ पासून शैक्षणिक चळवळीत सहभाग. आदिवासी अतिक्रमण वनजमीन धारक चळवळीचे नेते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आई सावित्रीबाई, राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवनावर उत्तम व्याख्यान करणारे विचारवंत, साहित्यिक, निर्भिड पत्रकार मा. विजय सहदेवराव पोहनकर यांनी श्रध्देय अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज यशवंत भवन अकोला येथे श्रध्देय अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते आपल्या शेकडो समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
  ह्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, ओबीसी नेते अ‍ॅड. संतोष राहाटे, ओबीसी नेते गोपाल राऊत, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, ओबीसी नेते गोपाल ढोरे पाटील, सनाउल्ला शहा व सिध्दार्थ शिरसाट उपस्थित होते. विजय सहदेवराव पोहनकर यांच्यासह, मुन्नाभाऊ जयस्वाल, जयमाल भिडया – संचालक एफ.एम सी. ओंकार लंगोटे – माजी सरपंच कवढळ, अनंता राजुरकर, कृष्णा कावरे सदस्य, नितीन भगत ग्रा. प. सदस्य वडशीगी, गणेश डामरे, मंगेश खंडारे, डिंगावर अंबुस्कार, भानुदास खोडकर, अंबादाल सातव, प्रकारा सातव, सुखदेव बापट, नंदु वसतकार, मंगेश चांदुरकर, सुभाष मदनकार, गणेश कळस्कार, देवलाल वसतकार, ब्रम्हदेव वसतकार, गजानन वसतकार, गुणवंत पाटील ग्रा. प. सदस्य वडगाव (पा), कुणाल रजाने, गुलाबराव पाटील, संदिप तायडे, पुर्णाजी मुंडोकार, किसन मुंडोकार, हरीभाऊ तायडे, रमेश बेरागी, गजानन चोखंडे, विजय पारस्कार, भगवान ढगे, अरुण मुंडोकार यांच्या शेकडो समर्थकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत राज्यभरातील बारा बलुतेदार यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत श्रध्देय अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे.
मनसेला विदर्भात खिंडार पाडून बहुसंख्य बारा बलुतेदार ओबीसीना सोबत घेऊन  मनसेचे प्रदेश चिटणीस विजय पोहनकर यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केल्यामुळे बारा बलुतेदार समाजात प्रचंड उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी विजय पोहनकर ९५७९१४१६१८ यांचे बारा बलुतेदार समाजाकडूनच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजातून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here