नागपूर : (25 जानेवारी)
   डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचा राज्यस्तरीय महागौरव पुरस्कार विदर्भ विभागातून यावर्षी प्रयोगशील शेतकरी वर्षा तुळशीदास लांजेवार यांना जाहीर झाला आहे. राज्याच्या 8 विभागांमधून एकूण 14 समाजसेवकांना हा पुरस्कार दिला जाईल. कोल्हापूरच्या कन्हेरी मठात 29 जानेवारीला होणाऱ्या द्वितीय वार्षिक अधिवेशनात हे पुरस्कार वितरण होईल. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, विदर्भ विभागीय अध्यक्ष विनोद देशमुख, विभागीय कार्याध्यक्ष नरेन्द्र वैरागडे, राज्य संघटक सुरेश वांदिले, सविता कुळकर्णी आदी पदाधिकाऱ्यांनी वर्षाताईंची एकमताने निवड केली.
चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील चिंधीचक गावच्या वर्षाताई स्वत: शेती करतात आणि इतर महिलांनीही शेतकरी बनावे यासाठी प्रचार, प्रोत्साहन, मार्गदर्शन करीत असतात. शिवाय, उत्पादित शेतमाल स्वत:च विकणे, तांदळाचे नवनवे वाण, सेंद्रिय खते, शेळीपालन, कुक्कुटपालन या उपक्रमांद्वारे शेतीचे महत्त्वही त्या अधोरेखित करीत असतात. “महिला शेतीच्या प्रचारक” अशी त्यांची ओळखच निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here