मोरया फाउंडेशन तर्फे आयोजित वेशभूषा आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन नुकताच झालेला रविवारी २१ जानेवारी रोजी, शिवाजी हॉल दत्तात्रय नगर, नागपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी आमदार अभिजीत वंजारी कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच अध्यक्ष अविनाश चौहाण होते, विशेष अतिथी मिसेस कल्याणी हूमने, पोलिस इन्स्पेक्टर क्राईम ब्रांच अजनी ह्या होत्या. कार्यक्रमांची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक मोरया फाउंडेशन च्या संस्थपिका रजनीताई चौहाण यांनी केले. स्वरधारा या समूहातील अंध गायकांनी स्वागत गीत प्रस्तूत केलें, त्यानंतर दिव्यांग मृणाल मुळे यांच मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश चौहाण यांनी मदत निधी व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी दीव्यांग विद्यार्थ्यांनी साईबाबा वरील नृत्य नाटिका सादर केली. आणि अंध व मतीमंद मुलांनी रॅम्पवॉक केला. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थांचा प्रमूख पाहुण्यांच्या हस्ते स्मृती चिन्ह आणि पारितोषिक देऊन त्यांचे उत्साहवर्धक करण्यात आले. आपल्या भाषणात आमदार अभिजीत वंजारी यांनी मोरया फाउंडेशन करीत असलेल्या कार्याची प्रशंसा केली. आणि दीव्यांगाना मदतीचे आश्वासन दिले. तसेच कल्याणी हूमने यांनी आपले पोलिस खात्यातील अनुभव सांगुन भविष्यात या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठया संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हर्षल गोडेवार यांनी केले तर आभार  प्रदर्शन रजनीताई चौहाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणव हळदे, सुरेश चवहरे, श्रीमती शिल्पा सिंगम, माधुरी इत्तडवार, मनीषा भोयर, फाल्गुनी निमजे, सुवर्णा रहाटे, वैशाली नंदनवार, संध्या जैस्वाल, शिखा इत्यादींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here