प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभय धकाते यांचे आमरण उपोषण सोडविले. 
        आदिम हलबांच्या जुन्या अभिलेख्यात कोष्टी (विणकरी) या व्यवसायाची नोंद असल्याने भाजप सरकारने केंद्राच्या सरकारकडे घटना दुरुस्तीची  शिफारस करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी  राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने आदिम हलबांचा आक्रोश दाखविण्यासाठी गोळीबार चौकात आमरण उपोषण सुरु होते. मोर्चाच्या शिष्टमंडळाने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मागणी संदर्भात चर्चा करतांना गोळीबार चौकात सुरु असलेले आमरण उपोषणाची दखल घेतली. अभय धकाते यांचे आमरण उपोषण सोडविण्यासाठी  भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे,आमदार विकास कुंभारे व आमदार प्रवीण दटके हे उपोषण मंडपात आले. त्यावेळी हलबा बांधवांनी जय भीम जय आदिम, हलबा एकता जिंदाबाद , हमारी मागणी पुरी करो, कोष्टी आमरो धंदा आहा – हलबा या आमरी जमात आहा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद , संविधानाचा विजय असो- विजय असो. अश्या गगनभेदी नारे लावून गोळीबार चौक दणाणून सोडला.
                                   यावेळी उपोषण मंडपात आदिम नेत्या ॲड.नंदा पराते, दे.बा.नांदकर, धनंजय धापोडकर, दिपराज पार्डीकर, प्रवीण भिसीकर, राजेंद्र सोनकुसरे, राजू धकाते, प्रेमलाल भांदककर, जितेंद्र मोहाडीकर, अश्विन अंजीकर, दिपक उमरेडकर, श्याम चांदेकर, प्रदीप पौनीकर, मोरेश्वर पराते, जिजा धकाते, छाया खापेकर, नरेंद्र भिवापूरकर, श्रीकांत ढोलके, नरेंद्र मौदेकर, शिवशंकर रणदिवे, भास्कर चिचघरे, पंकेश निमजे, चेतन निखारे, आकाश पौनीकर, रवी पराते, मोतीराम मोहाडीकर, सचिन बोरीकर, विजय धकाते, शुभम खडगी आदी उपस्थित होते.
                                   भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमरण उपोषणकर्ते अभय धकाते यांचे उपोषण सोडवितांना आदिम हलबा, हलबी जमातींच्या मागण्या शासनाकडून त्वरित पूर्ण करण्याची जबाबदारी घेत असल्याची घोषणा शेकडो हलबा बांधवांसमोर केली.
                                   मोर्चाच्या शिष्टमंडळाने मागण्यासंबंधी उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर हलबांच्या जुन्या अभिलेख्यात कोष्टी ( विणकरी ) व्यवसायाची नोंद असल्यासंबंधी केंद्र सरकारकडे घटना दुरुस्तीची शिफारसचा प्रस्ताव पाठवू, संसदेचा केंद्रीय कायदा क्रमांक १०८/१९७६ प्रमाणे २७ जुलै १९७७ पासून अनुसूचित जमातीचा दर्जा आदिवासींना मिळाला म्हणून सन १९७६ पूर्वीचे अभिलेख विचारात घेऊन जात व वैधता  प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा जी.आर. काढण्यात येईल, अनुसूचित जमातीच्या कर्मचा-यांच्या सेवा अधिसंख्य पदावर वर्ग  झाल्यानंतर सर्व शासकीय लाभ देण्यात येईल, हलबा युवकांच्या  रोजगारासाठी महामंडळ करण्यात येईल.असे आश्वासन उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here