आमच्या पायाखालची वाळू सरकत आहे, पण आम्हाला माहीतच नाही, भाऊसाहेब थुटे
नागपूर:  “गुणवैभव” या गौरव ग्रंथ लोकार्पण सोहळ्यात सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटेनी कार्यक्रमाचा अध्यक्ष व्हावा, म्हणून मला गुणेश्वर साहेबांनी दोन तीनदा फोन केले. माझा कार्यक्रम दोन महिने आधी ठरलेला असल्याने, मी बरोबर सव्वा दहा वाजता इथे पोहोचलो. या सभागृहाच्या भोवती दोन-तीन चकरा मारल्यात. काही सापडलं नाही, कारण हे गर्दीतले सभागृह आहे. गुणेश्वरांवर तसेच त्यांच्या गुणांवर प्रेम करणारा सर्व आपला समुदाय अत्यंत जिव्हाळ्यातून प्रेम करणारे लोक या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही मागे का आहोत ? तर आम्ही कुणाचेही ऐकत नाही. सर्वात मोठा गुण जर कोणता असेल तर तो ऐकण्याचा असला पाहिजे असं मला वाटते. आज आमच्या पायाखालची वाळू सरकत आहे, पण आम्हाला माहीतच नाही, कारण आपण कधीच कुणाचे ऐकत नाही. मलाच खूप काही समजते. या अविर्भावात आपण राहतो. म्हणून आपण मागासलेले समजले जातो. असे प्रतिपादन सप्तखंजेरी वादक ‘भाऊसाहेब थुटे’ यांनी काढले. ते प्रकाशन समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोषाध्यक्ष, समाजरत्न ‘गुणेश्वर आरीकर’ यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यक्तीचरित्राचा लेखाजोखा मांडणा-या ‘गुणवैभव’ या विशेषांकाचे प्रकाशन दि. २४ डिसेंबर रविवारी संताजी सांस्कृतिक सभागृह, बुधवारी बाजार, नागपूर येथे मोठ्या थाटात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. आयोजित प्रकाशन समारंभास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व महासंघाच्या कार्याध्यक्षा शरयु तायवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, प्रकाशक व गुणवैभव विशेषांकाचे संपादक राहुल पाटील, सचिव पल्लवी पाटील, डॉ.आशीष उजवणे, आमदार मोहन मते, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार देवरावजी रडके, प्रा.शेषराव येलेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, उपाध्यक्ष, रत्नमाला भोयर, माजी नगराध्यक्ष, आस्तिक पाटील सहारे, समाजसेवक, डी.के.आरीकर, दलित मित्र व आदिवासी सेवक, चंद्रपूर, दादाराव तिवाडे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक, तळेगाव जि. अमरावती, संपादक प्रदीप महाजन, डॉ.बळवंत भोयर, रामरतन देशमुख, विनोद आरीकर, सुरेश वांढरे या मान्यवरांच्या हस्ते ‘गुणवैभव’ विशेषांकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी गुणेश्वर आरीकर यांनी माधुरी आरीकर व कुटुंबातील वडील पुरुषोत्तम आरीकर, आई प्रभावती आरीकर, मुलगा अभिजित आरीकर, मुलगी अश्विनी आरीकर व आप्तेंष्टासोबत केक कापून ५१ वा वाढदिवस साजरा केला. गुणेश्वर आरीकर यांच्या वाढदिवसानिमित केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांनी आभासी चलचित्राद्वारे शुभेच्छा दिल्यात. ते म्हणाले, ‘आरीकर यांचे व्यक्तिमत्व हे समाजात आपल्या सगळ्यांकरीता एक आदर्श व्यक्ती आहे. त्यांच्या या गौरव ग्रंथाच्या निमित्ताने त्यांचे विचार त्यांचे व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जाईल आणि त्यांनाही सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे. गुणेश्वर आरीकरांना भगवंताने उत्तम आरोग्य द्यावे, स्वास्थ्य द्यावे, दीर्घायुष्य द्यावे आणि शेवटपर्यंत त्यांच्या समाजाची सेवा उत्तम रीतीने घडत राहावी याकरता त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.’ आयोजित प्रकाशन समारंभास विदर्भातील खैरे कुणबी समाज संघटनेच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिका-यांनी याप्रसंगी गुणेश्वर आरीकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाचे बहारदार संचालन अरूणा भोंडे व प्रा.नरेंद्र आरेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय रंदाळे, प्रणित गजभिये तसेच गुणवैभव गौरवग्रंथ समितीने अथक परीश्रम घेतलेत. या भरगच्च कार्यक्रमास ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here