नागपूर :  प्रकाश सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित सेव्हन स्टार्स स्कूल मंगलदीप नगर मानेवाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. सदर कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष रमेश ज्योतिरामजी लोखंडे व जहांगीर शेख (३ इडियट्स चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात दाखवलेल्या स्कूटरचा निर्माता ) आणि संस्थेच्या सचिव सौ. सत्यभामाताई रमेश लोखंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. कार्यक्रमा प्रसंगी मुलांनी अनेक गाणी, नृत्य व कला सादर केल्या. मुलांनी सादर केलेल्या गाण्यांना, नृत्याला आणि कलेला पालक व उपस्थितांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक आकाश लोखंडे, डॉ. स्नेहा लोखंडे, शिक्षिका व सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here