नागपूर : विदर्भ राज्य निर्मितीच्या निर्णायक लढ्याची सुरुवात २७ डिसेंबर २०२३ पासून ३१ डिसेंबर २०२३ पासून पूर्वी करू किंवा मरू पण विदर्भ राज्य मिळवून राहूच”-अँड. चटप विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन २०२३ अंतर्गत “विदर्भ मिळवू औंदा” ही घोषणा केल्याप्रमाणे ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास घटनेच्या कलम ३ प्रमाणे केंद्र सरकारला बाध्य करण्याकरीता व निर्णायक लढा अंतिम टप्प्यापर्यंत नेऊन विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करून नव्या पिढीच्या हाती यथाशिघ्र सूत्र स्वाधीन करण्याचे दृष्टीने २७ डिसेंबर २०२३ पासून निर्णायक लढ्याची मुहूर्त मेढ रोवण्याकरीता संविधान चौक, नागपूर येथे यापूर्वी घोषणा केल्याप्रमाणे “करू, मरू किंवा जेल मध्ये सडू व विदर्भाचे राज्य मिळवून राहूच” या हेतूने लोकशाहीतील सविनय कायदेभंगाच्या आंदोलना बरोबरच आत्मक्लेश आंदोलन म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ६ प्रमुख नेते सहकारी नेत्यांसह २७ डिसेंबर ला दुपारी १२ वाजता पासून संविधान चौकात आमरण उपोषणाला / प्राणांतिक उपोषणाला सुरुवात करीत आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अँड. वामनराव चटप, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे, पूर्व विदर्भाचे विराआंसचे अध्यक्ष अरुणभाऊ केदार, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई मामर्डे व दैनिक कशिश चे संपादक अँड. वीरेंद्रकुमार जेस्वाल उपोषणाला सुरुवात करणार आहेत. समितीने ११८ वर्षापासूनची गेल्या ३ पिढ्यांपासून सुरु असलेली स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची मागणी कायम निकाली काढण्याचे दृष्टीने या निर्णायक लढ्याची सुरुवात केलेली आहे. त्याच क्षणी विदर्भाच्या पश्चिम टोकावर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात आमरण उपोषण प्राणांतिक उपोषण विदर्भ राज्य आंदोलन समितीचे बुलढाणा जिल्ह्यातील नेते २७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता पासून जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा समोर “शेंडी तुटो की पारंबी तुटो” अशा भूमिकेने विदर्भाचे राज्य मिळवून राहूच म्हणून उपोषणाला कृतीने सुरुवात करीत आहे. त्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अँड. सुरेश वानखेडे, जिल्हा समन्वयक तेजराव मुंढे, प्राचार्य राम बारोटे, कोर कमेटी सदस्य कैलाश फाटे, प्रकाश अवसरमोल व रविकांत आढाव (अमरावती) हे आंदोलनाला सुरुवात करणार आहे. महाराष्ट्र राज्य दिवाळखोरीत निघालेले असून कर्जाच्या ओझ्याखाली कायमचे दबलेले आहे. विदर्भातील जनतेला नव्या पिढीला न्याय मिळण्याचे दृष्टीने शेतकरी आत्महत्या थांबविण्याचे दृष्टीने, सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न असलेल्या नक्षलवादाला आळा घालण्याचे दृष्टीने, प्रदूषण व कुपोषण थांबवून बाल मृत्यू व गर्भार माता मृत्यू कायम आटोक्यात आणण्याचे दृष्टीने व कमी झालेले ४ आमदार व १ खासदार रोजगाराच्या संधी निर्माण करून स्थलांतर कायमस्वरूपी टाळण्याचे दृष्टीने विदर्भातील जनतेकरीता एकच उपाय ते म्हणजे “स्वतंत्र विदर्भ राज्य म्हणून “अभी नही तो कभी नही म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने लोकशाहीतील शेवटचे आत्म्क्लेशाचे हत्यार उपसले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अँड. वामनराव चटप, रंजनाताई मामर्डे, अरुण केदार, प्रा.प्रभाकर कोंडबत्तूनवार, अशोक पाटील, राजेंद्र सतई, अँड. मृणाल मोरे यांनी परिषदेत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here