भारतासह महाराष्ट्रातील नागरिकांनी 31 डिसेंबर 2023 ला निरोप देतांना व नवीन वर्षाचे म्हणजेच 2024 चे स्वागत करतांना वाढत्या दुर्घटना पहाता मद्यपिऊन वाहन चालवु नये, स्टंटबाजी करू नये, वाहन चालवितांना मोबाइलवर बोलने टाळावेत, जास्त जल्लोष टाळला पाहिजे. प्रशासन किंवा पोलिस विभाग यांना सहकार्य करुन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, नवीन करोनाचा धोका पहाता सर्वांनीच सावधगिरीने नवीन वर्षाचे स्वागत करावे, मास्कचा वापर करावा. कारण पुढे चालून परिस्थिती गंभीर होणार नाही याकरिता स्वत:वर सर्वांनीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आता करोणाच्या चौथ्या जेएन-1 या व्हेरिएंटने प्रवेश केला आहे किंवा करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येकांनी सावध रहाणे गरजेचे आहे. 2020 व 2021 ने संपूर्ण जगाला दु:खाच्या सागरात लोटले होते. करोणा संक्रमणामुळे अनेक हासते-खेळते परिवार उध्दवस्त झाले व अनेकांचा रोजगार गेला. यामुळे जगावर आर्थिक संकट सुध्दा ओढवले होते. त्यावेळेस भारतासह संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळली सुद्धा होती. संपुर्ण जग शांततेने जीवन जगत होते. परंतु करोणाच्या रूपाने चीनने विषाणू पसरवून मृत्यृचे तांडव निर्माण केले होते. वाढते प्रदुषण पहाता सर्वांनीच मास्क  लावने गरजेचे आहे, जगातील कोणतीही महामारी असो, वाढते प्रदुषन, ग्लोबल वॉर्मीग, जंगल तोड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, परमाणु परीक्षण, युद्धजन्य परिस्थिती, पृथ्वीवरील वाढता दारूगोळा इत्यादी अनेक कारणांमुळे पृथ्वीचे संतुलन डगमगत आहे व यामुळे जमिनीमध्ये विषारी घटक जाऊन भूजलसाठा दुषित होत आहे. याचे प्रायचीत्य जगातील संपूर्ण जीव सृष्टीसह, मानव, जीव-जंतु भोगत आहे आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार आहे फक्त मानवजातीच आहे, मग ती कोणत्याही देशाची असो. म्हणेच आज मानवाने स्वत:हुन “मौत का कुंवा” खोदुन ठेवला आहे. करोणा महामारी ही मानवाचीच देन आहे. म्हणजेच आज मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी जगाचे वाटोळे केले आणि मृत्यूला कवटाळण्यासाठी “आ बैल मुझे मार” अशी परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे जगाने करोणा महामारीपासुन काहीतरी धडा घेतला पाहिजे व निसर्गाचे संतुलन स्थीर ठेवण्यावर जोर दिला पाहिजे.
2020 व 2021 ने जगाच्या प्रत्येक देशांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या जखमा व घाव घातले हे कोन्हीही विसरणार नाही. या संपूर्ण जखमा भरून काढण्याची संपूर्ण मानवजात एकवटली पाहिजे व 2024 चे स्वागत केले पाहिजे. जनतेला मी आग्रह करतो की 2024 आला म्हणून हवेत उडु नका किंवा अतिरेक करू नका. कारण नवीन जेएन-1 या व्हेरिएंटने जगात प्रवेश केला आहे व करोनाचा धोका दाराशी येऊन उभा आहे. त्यामुळे मास्कचा वापर करने काळाची गरज आहे. 2020 व 2021  ने मंदिर-मज्जीद, गुरूव्दारा, चर्च, बौद्ध विहार इत्यादी अनेक धार्मिक देवस्थान व पर्यटन स्थळांपासुन जगातील संपूर्ण मानवजातीला दुरावले गेले होते. परंतु आता 2024 मध्ये पुर्वीसारखी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. त्यामुळे 2024 या नवीन वर्षात प्रवेश करतांना करोणा महामारी व इतर परिस्थिती पाहता सर्वांनीच सावधगिरी बाळगली पाहिजे व नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने व आनंदाने साजरे केले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. नववर्षाच्या निमित्ताने भारतासह महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष लावुन नवीन वर्षाचे स्वागत करावे. यामुळे एकाचवेळी लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड होईल. यामुळे गुरांना चारा व मानवाला शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल. यामुळे प्रदूषणावर मात करता येईल. देशात जेएन-1 करोनाच्या व्हेरिएंटचा धोका पहाता नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वांनीच जागरूक व सावध असलेच पाहिजे. नवीन वर्षाचे स्वागत सर्वांनीच अवश्य केले पाहिजे परंतु जरा जपून! आपण सर्वांनीच शपथ घेतली पाहिजे की नवीन वर्षात नवीन संकल्प, नवीन उमंग, नवी आशा, नवीन दिशा, नवीन आकांक्षा निर्माण व्हावी याच उद्देशाने पुढचे पाऊल टाकावे व येणाऱ्या नवीन व्हेरिएंटच्या करोनाला रोखण्यासाठी सर्वांनीच कटीबद्ध रहाले पाहिजे. राज्य सरकारने 31 डिसेंबर2023च्या निमित्ताने व 2024 च्या आगमनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले पाहिजे. यातच नवीन वर्षाचे खरे स्वागत दिसून येईल व 2024 वर्षांचा हा आगळावेगळा उपक्रम अनंत काळापर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहील. नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here