राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर ही राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) द्वारे 2022-23 वर्षात घेण्यात आलेल्या सब रजिस्टार म्हणजे उपनिबंधक (ग्रेड-1) मुद्रांक निरीक्षक आणि एसटीआय म्हणजे राज्य कर निरीक्षक परीक्षेच्या निकालात महाज्योतीच्या 15 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत आहे. विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी दिली.
एमपीएससीच्या सब रजिस्टर पदाची तब्बल 12 वर्षानंतर परिक्षा घेण्यात आली होती. यात 35 जागा ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी होत्या. महाज्योती अंतर्गत ज्ञानदीप अकादमीचे 8 विद्यार्थी उत्तीर्ण होत त्यांनी यश प्राप्त केले आहे. तसेच 77 पदांसाठी राज्य कर निरीक्षक (एसटीआय) परीक्षेत ओबीसी प्रवर्गासाठी 36 जागा होत्या. यात ज्ञानदीप अकादमीचे 7 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच महाज्योतीचे 15 ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती श्री. राजेश खवले यांनी दिली.
शिक्षणाचे महत्व अबाधित आहे. शिक्षणामुळेच आपले स्वप्नांची दारांची चावी मिळविता येते. यानंतरच भविष्यात यशस्वी करियर घडविण्याचा मार्ग मोकाळा होत असतो. यानंतर विद्यार्थ्यांना शासन सेवेत योग्य ती संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य हे महाज्योती करीत आहे. दर्जेदार प्रशिक्षणातूनच दिसून येत असल्याचा विश्वास श्री. राजेश खवले यांनी व्यक्त केले. महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री मा. श्री. अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here