महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर येथे सोमवार दि. 25 डिसेंबर 2023 ला सर्व शाखीय माळी समाजाचा राज्यस्तरीय भव्य उपवर वर-वधू परिचय मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, प्रमुख वक्त्या डॉ. लीना निकम व माजी आमदार  अशोकराव मानकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली. मान्यवरांचा हस्ते  योगायोग, या परिचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या पुस्तिकामध्ये 1525 उपवर युवक युवतीची माहिती उपलब्ध आहे. कार्यक्रमात 150 युवक-युवतीनी परिचय दिला. कार्यक्रमाला लाभलेल्या वक्त्या डॉ. लीना निकम यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले, आजचा काळात लग्न सोहळा हा सत्यशोधक विवाह पद्धतीने व्हावा, अक्षदा ऐवजी फुलांचा उपयोग करावा, विवाहामध्ये जास्त पैसे खर्च करू नये असे मार्गदर्शन केले. माजी आमदार अशोकराव मानकर यांनी शाखा वाद सोडून सर्व समाजांनी एकत्र यावे, शुभ कार्यक्रमात जात असतांना हार तुरे, पुष्पगुछ ऐवजी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांची जीवन चरित्र पुस्तके भेट दयावी, हुंडा पद्धती ला विरोध करावा, व समाजाने एकसंघ राहावे ही काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. अरुण पवार सर यांनी संस्थेचे विविध सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना महात्मा फुले उपवर वर-वधू परिचय मेळावा चे प्रमुख संयोजक सुनील चिमोटे यांनी केले तर संचालन सौ. उज्वला राजेंद्र पाटील यांनी केले तर , आभार प्रदर्शन सह संयोजक शरद चांदोरे यांनी मानले. कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता समिती सहसंयोजक अजय गाडगे, धनराज फरकाडे, राजू गाडगे व समिती सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. सांस्कृतिक समितीतर्फे संगीत कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाब चिचाटे, सरचिटणीस रवींद्र अंबाडकर, सहचिटनीस रमेश राऊत, कोषाध्यक्ष प्रा. मुकेश घोळसे, संचालक कृष्णा महादुरे, राजेंद्र पाटील, मोहित श्रीखंडे, डॉ. प्रा.अभिजीत पोतले, नंदू कन्हेर, प्रा.पंकज कुरळकर, देवेंद्र काटे, संचालिका श्रीमती शोभा लेकुरवाळे, सौ. डॉ.अलका झाडें, सौ. माधुरी गणोरकर व मोठया प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. महिला समिती सदस्यांनी परिचय पत्राचे वाचन केले. समिती सदस्यां सौ. सुलेखा पवार, सौ. शालिनी पवार, सौ. विजया अंबाडकर, सौ. नयना गाडगे, सौं.अर्चना तिजारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here